रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने खंडाळा येथील अंध आश्रमात प्रौढ डायपर वाटप



मावळ मराठा न्युज :-खंडाळा,दिनांक २० ऑक्टोबर,२०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने २०० प्रौढ डायपर जुना खंडाळा येथील नॅब लायन्स होम फॉर एजिंग ब्लाइंड या अंध आश्रमात वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ लोणावळा चे अध्यक्ष नारायण शर्वळे,रोटरीयन ऍड मोनाली कुलकर्णी शेलार, रो.नितीन कल्याण , रो.विजया नितीन कल्याण, रो.धीरूभाई कल्याणजी, रो.जयवंत नलोडे, रो.रवींद्र कुलकर्णी, रो.पुंडलिक वानखेडे आणि रो. मुश्तफा कॉन्ट्रॅक्टर आदी मान्यवर उपस्थित होते. ब्लाइंड होमच्या व्यवस्थापिका सौ नीलम यावेळी उपस्थित होत्या.




