रोटरी क्लब,राष्ट्रीय हरित सेना, सिंहगड पब्लिक स्कूल च्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांत निमित्त हळदी कुंकु

मावळ मराठा न्यूज लोणावळा,”रोटरी क्लब आणि राष्ट्रीय हरित सेना, अर्थात इको क्लब, सिंहगड पब्लिक स्कूल च्या संयुक्त विद्यमाने १ फेब्रुवारी २०२३, रोजी मकरसंक्रांति विशेष हळदी कुंकु समारंभ” सिंहगड पब्लिक स्कूल च्या प्रांगणात पार पडला. कार्यक्रमासाठी रोटरी क्लब चे अध्यक्ष श्री आशिष मेहता यांची विशेष उपस्थिति होती.त्यांनी पर्यावरण रक्षणाची माहीती दिली.समारंभाचे विशेष रूप म्हणजे प्लास्टिक चा वापर टाळुन कापडी पिशवी वापरण्यासाठी जनजागृति करणे. रोटरी क्लब ने कापडी पिशव्या देऊन सर्वांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.यावेळी शिक्षकां मध्ये खूप उत्साह दिसुन आला. सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ देखील घेतली. शाळेचे प्राचार्य एन.के. मिश्रा यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.




