संपर्क लिली इंग्लिश मीडियम स्कूलचे बेलारूस आंतरराष्ट्रीय बाल मेळाव्यात शिवाजी महाराज आणि महाभारतातील प्रसंगावर उत्कृष्ट सादरीकरण

मावळ मराठा न्युज संपर्क लिली इंग्लिश मीडियम स्कूल, भाजे–मळवली यांनी बेलारूस येथील झुब्रेनोक पार्क येथे झालेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बाल मेळावा कार्यक्रमात भारताचे मोठ्याआत्मविश्वासाने प्रतिनिधित्व केले. दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी शाळेतील हुशार विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित प्रभावी सादरीकरण करून रशिया,बेलारूस, अझरबैजान,कझाकस्तान,ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान,चीन आणि उझबेकिस्तान या बेलारूसच्या मैत्रीपूर्ण देशांतील १४०० हून अधिक विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.पुढील दिवशी पथकाने भारतीय महाकाव्य महाभारत याचे सादरीकरण केले, ज्याला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वर्षी भारताची या कार्यक्रमातील सहभागिता संपर्क मार्फत झाली असून, यामुळे सांस्कृतिक संबंध बळकट होऊन राष्ट्रांमध्ये मैत्री वृद्धिंगत झाली आहे.एकूण २४ विद्यार्थी आणि २ शिक्षक ३ ऑगस्ट २०२५ पासून झुब्रेनोक पार्क येथे वास्तव्य करत असून १५ ऑगस्ट २०२५ रोजी मळवली येथे परततील.महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिनांक २२ मे २०२५ रोजी पाठवलेल्या पत्राद्वारे पथकास शुभेच्छा दिल्या. माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितजी पवार आणि माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी देखील या विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रमासाठी आपले शुभेच्छा संदेश व प्रोत्साहन पाठवले.संपर्कचे संस्थापक संचालक व सचिव श्री अमितकुमार बॅनर्जी यांनी भविष्यात भारतातील विविध राज्यांतील व शेजारील देशांतील वंचित मुलांसाठी अशा प्रकारचे देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित करण्याची आशा व्यक्त केली. तसेच पुणे जिल्ह्यात सांस्कृतिक व आरोग्य पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगितले.श्री अमितकुमार बॅनर्जी यांच्यासह श्री सतीश माळी आणि सौ. राणी वाघमारे यांनी झुब्रेनोक पार्क येथे उपस्थित राहून उत्कृष्ट सादरीकरणे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण पाहिली.अशी माहिती संस्थापक संचालक / सचिव – संपर्क संस्था अमितकुमार बॅनर्जी यांनी प्रसिद्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page