गड किल्ले स्पर्धा मावळ मुळशी या दोन्ही तालुका पातळीवर तोरणा किल्ल्यासाठी युवराज पारगे आणि टीम प्रथम

मावळ मराठा न्यूज़ :-तळेगाव दिवाळी निमित्त गड किल्ले प्रतिकृती निर्मितीची ही स्पर्धा मावळ मुळशी या दोन्ही तालुका पातळीवर भरविण्यात आली होती. या स्पर्धेत दोन्ही तालुके मिळून अत्यंत अभ्यासू अशा ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात खास करून हिंजवडी, चांदखेड, तळेगाव या विभागातील इतिहास प्रेमी स्पर्धकांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन सकल हिंदू समाज केले होते.स्पर्धेच्या सर्व निकषाला पात्र ठरलेल्या स्पर्धकांना एकूण तीन बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.त्यात प्रथम क्रमांक लायन्स क्लबच्या क्रीडांगणावर तोरणा किल्ल्याच्या प्रतिकृतीची निर्मिती करणाऱ्या चिरंजीव युवराज पारगे आणि त्याच्या टीमला देण्यात आले. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या युवराजच्या या टीमचे हे अकराव वर्ष.या अकरा वर्षातील या टीमने जवळजवळ नऊ स्पर्धेत विविध क्रमांकाची बक्षीस पटकावली. यावर्षी मात्र सर्वार्थाने तोरणा किल्ल्याच्या प्रतिकृतीची निर्मिती केल्याबद्दल युवराजच्या या टीमला प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात आले. म्हणूनच या सर्व टीमचे सर्वत्र अभिनंदन आणि अभिष्टचिंत केले जात आहे.लायन्स क्लब तळेगावचे अध्यक्ष डॉक्टर लायन अनिकेत काळोखे प्रकल्प अधिकारी लायन मनोहर दाभाडे, उद्घाघाटक प्राध्यापक प्रमोद बोराडे,मुख्य पाहुणे लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी आणि सर्व लायन सदस्यांनी चिरंजीव युवराज पारगे आणि त्याच्या सर्व टीमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि अभिष्टचिंतन केलं. न्यू इंग्लिश स्कूल चांदखेडच्या पटांगणात या अतिशय सुंदर बक्षीस समारंभात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या टीमला शिवछत्रपतीची मूर्ती, सन्मान चिन्ह आणि प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page