शिवसेना लोणावळा ” उपशहरप्रमुख ” पदी श्री विनायक शिंदे यांची निवड



मावळ मराठा न्युज :-लोणावळा,शिवसेना लोणावळा ” उपशहरप्रमुख ” पदी श्री विनायक शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली.मावळ लोकसभेचे महा संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते विनायक शिंदे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी जिल्हा संघटक अंकुश देशमुख, तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर, महिला जिल्हा संघटिका शैलाताई पाचपुते, उपतालुका प्रमुख राम सावंत, तालुका संघटक चंद्रकांत भोते, देहू शहरप्रमुख सुनिल हगवणे, तळेगाव शहरप्रमुख देवा खरटमल, वडगांव शहरप्रमुख प्रविण ढोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख गिरीश सातकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख दत्ता केदारी, युवासेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे, महिला आघाडीच्या शुभांगीताई काळंगे, मनीषाताई भांगरे, कविताताई हुलावळे,सरपंच संदीप शिंदे, देहूरोड शहर प्रमुख दिपक चौगुले, मा शहरप्रमुख मुन्ना मोरे, लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, निखिल सोमण, समन्व्यक नंदू कडू, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे, विभागप्रमुख प्रसाद कन्नन, विभागप्रमुख प्रमोद लोहिरे, शाखाप्रमुख संतोष दरडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.




