टाकवेतील बैलगाडा शौकिनांसाठी बैलगाडा घाटात स्वखर्चाने प्रशस्त स्टेजचे रोहीदास असवले यांचे हस्ते भूमिपूजन



मावळ मराठा न्युज :-टाकवे बुद्रुक, येथील टाकवे-नाणे जिल्हा परिषद भाजप गटाचे अध्यक्ष रोहीदास असवले यांनी टाकवेतील बैलगाडा शौकिनांसाठी बैलगाडा घाटात स्वखर्चाने प्रशस्त स्टेज बांधून देणार असा शब्द मागील वर्षी टाकवे बु.यात्रेच्या दिवशी दिला होता. अखेर तो शब्द पुर्ण करत वाढदिवसाचे(दि.१०) औचित्य साधून स्टेजच्या कामाचे भूमी पुजन सर्व बैलगाडा मालकाच्या उपस्थितीत करण्यात आले.सदर बांधण्यात येणारा स्टेज संपूर्ण आरसीसी बांधकाममध्ये होणार असून दोन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या टाकवे गावच्या यात्रेच्या अगोदर या स्टेजचे संपूर्ण बांधकाम पुर्ण करण्यात येणार आहे. स्टेज झाल्यानंतर प्रेक्षकांना अधिक चांगल्याप्रकारे बैलगाडा शर्यत पाहण्यास मदत होणार आहे. सदर बांधकाम करण्यासाठी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असून स्वखर्चाने घाटासाठी स्टेज बांधून देणार असल्याने माजी उपसरपंच रोहिदासनाना असवले यांचे टाकवेतील बैलगाडा मालकांनी आभार मानले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी बैलगाडा मालक नंदूशेठ असवले, शिवाजी जांभुळकर,बाळासाहेब सवले,माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, पांडुरंग असवले,सोमनाथ असवले, साहेबराव आंबेकर, बाळासाहेब जांभुळकर,गोरख असवले, संतोष पिंगळे , अक्षय असवले, अजय जाधव,अर्जुन गुणाट,विलास असवले,चंद्रकांत जगताप, शरद गुणाट, अतुल जाधव समीर असवले,सुमित इंगळे, साईनाथ असवले,राजू जगताप यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.




