१५ मे बुधवारी लोणावळा आणि परिसरात चित्रित झालेल्या चित्रपट गीतांवर आधारित यादोंकी बारात यासोबतच भव्यलकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन



मावळ मराठा न्युज :- लोणावळा,लोणावळा खंडाळा परिसरात चित्रित झालेल्या चित्रपट गीतांवर आधारित यादों कि बारात या आगळ्या वेगळ्या गौरवशाली आणि अविस्मरणीय कार्यक्रम दिनाक १५ मे, बुधवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता लोणावळ्यात डॉ बी एन पुरंदरे मैदान येथे होत आहे.जगात प्रसिद्ध असलेल्या लोणावळा येथे १९१३ ते २०२४ या १११ वर्षाच्या काळात लोणावळा आणि परिसरात चित्रित झालेल्या गीतांचा सुंदर आणि बहारदार कार्यक्रम जेष्ठ अभिनेत्री तनूजा,जावेद अख्तर शबाना आझमी,मिलिंद गुणाजी,उत्तम सिंग,राकेश रोशन आणि परेश मोकाशी या दिग्गज मान्यवर यांचे सोबतच मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके,माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,ऍड.माधवराव भोंडे नंदकुमार वाळुंज नितीन अगरवाल नासिरभाई शेख,संजय अडसुले सुरेश गायकवाड़,श्रीराम कुमठेकर,विशाल पाडाले,ऍड.संजय पाटील,विश्वास कोटकर,दिनेश राणावत पांडुरंग तिखे आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लकी ड्रा यात मोठी आणि आकर्षक बक्षिसे असणार आहे आणि शिवाय हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे. तरी या अविस्मरणीय क्षणाचे आनंद घेण्यासाठी लोणावळा आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बापू तारे यांनी मावळ मराठा न्यूज़ शी बोलताना केले.




