केरळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अशोक मते आणि ज्योती कंधारे यांना सुवर्ण पदक


मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,नुकत्याच केरळ येथे पार पडलेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये लावून लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रचे अध्यक्ष अशोक मते व शिवदुर्गच्या जेष्ठ सदस्या सौ ज्योती कंधारे या दोघांनाही केरळ येथे झालेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे . शिवदुर्ग फिटनेस क्लबच्या माध्यमातून अनेक क्रीडा पटू जिल्हा,राज्य आणि देशपातळीवर आपले कर्तृत्व मिळवत आहेत.या फिटनेस क्लब चे प्रशिक्षक अशोक मते यांनी नुकतेच केरळ येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत निवड झाली होती त्यानी ह्यात सुवर्ण पदक मिळविले तर फिटनेस क्लबच्या जेष्ठ सदस्या असलेल्या आणि जागतिक पातळीवर स्ट्राँग वूमन चा किताब मिळवलेल्या ज्योती कंधारे यांनी केरळ येथे झालेल्या पॉवर लिफ्टींग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिले .त्यामुळे लोणावळ्यातील दोन्ही लोणावळ्याच्या अभिमानात भर टाकली आहे .मावळ मराठा न्यूज परिवाराच्या वतीने दोघांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.




