चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था आयोजित राष्ट्रीय पुरस्कार विजेता आयुर्वेद व निसर्गोपचार तज्ञ मा. स्वागतजी तोडकर यांच्या व्याख्यानाला लोणावळेकरांचा प्रचंड प्रतिसाद







मावळ मराठा न्युज – लोणावळा,चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा रोप्य महोत्सवी म्हणजेच २५ वर्षाची परंपरा पारदर्शक व विश्वासार्ह सेवा केल्या निमित्त राष्ट्रीय पुरस्कार विजेता आयुर्वेद व निसर्गोपचार तज्ञ मा. स्वागतजी तोडकर सर, कोल्हापुर यांचे शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी ऍड बापूसाहेब भोंडे हायस्कुल येथे चैतन्य स्वास्थम आरोग्य महोत्सव स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी तोडकर यांचेआरोग्य स्नेह आणि आनंदाचा उत्सव मध्ये आरोग्याची संजिवनी औषधंविना इलाज काय करायचा यावर स्वागत तोडकर याचे साध्या आणि ओघावत्या वाणीत व्याख्यान संपन्न झाले. वेगळ्या आजारावर स्वागत तोडकर यांनी साधी आपल्या स्वपाक गृहात असणाऱ्या आणि सहज घरात उपलब्ध असणाऱ्या उपचाराबद्दल सर्व माहिती दिली. यांस लोणावळेकर नागरिकांनी विशेषतः महिला वर्गाने मोठी उपास्थिती लावली.यावेळी दिवशी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित श्री क्षेत्र भंडारा डोंगर मंदिर बांधकामा करीता रू. १.११,१११/- रूपयेचा निधी बांधकाम समितीकडे सुपूर्त करण्यात आला. सदर प्रसंगी लोणावळा नगरींचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे,उपनगराध्यक्ष देविदास कडू, नंदकुमार वाळुंज,सनी घोणे,नगरसेवक जाकीर खलिपा,नगरसेविका तिकोने,मारोती तिकोने, अपर्णा बुटाला,भोंडे शाळेचे अध्यक्ष ऍड.माधवराव भोंडे,संभाजी मराठे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारूती बाबु साठे,अध्यक्ष जितेंद्र बबन राऊत,उपाध्यक्ष. कांताराम नथू दळवी व्यवस्थापक श्री. संभाजी दत्तात्रय पडवळ,श्री. रमेश विठ्ठल पिसे, एकनाथ सखाराम काळे, गोपाळ कृष्ण भवारी, सचिन गोसावी, दशरथ गांवकर अनिरुद्ध फाटक, सौ. गौरी केदारी, सौ. मनिषा तिकोणे,तज्ज्ञ संचालक अॅड. सुनिल गाडे, रमेश कुंभार सल्लागार बबन लक्ष्मण फाटक, शशिकांत खंडेलवाल, सर्व सेवक वर्ग, दैनंदिन बचत प्रतिनिधी, सर्व सभासद हितचिंतकमोठ्या संख्येने उपस्थित होते.



