काशीचे राजे राजबहादूर देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शनास



मावळ मराठा न्युज-देहू /प्रतिनिधी,छत्रपती शिवाजी महाराज शोध संस्थान एवंम राजदीप कॉलेज मिर्जापूर, बनारस ( उत्तरप्रदेश ) मधील विद्यार्थी यांचे सह काशीचे राजे राजबहादूर यांनी देहूत श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे दर्शन घेत श्रीक्षेत्र देहू देव दर्शन करीत देहू मंदिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी देहू संस्थांचे वतीने अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे हस्ते मंदिरात त्यांचा संत तुकाराम महाराज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वैभवी प्रतिमा भेट देऊन देवस्थान तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांचे तर्फे श्री संत तुकाराम महाराज गाथा हिंदी आवृत्ती खंड भेट देऊन राजे राजबहादूर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लक्षवेधी मोत्यांची माळ, उपरणे, फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ह.भ.प. जनार्धन महाराज पाटील, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर,भूषण महाराज सूर्यवंशी, शिवजी घेगडे, दत्तात्रय हगवणे, गौतम खंडागळे, माणिक हिंगे, देहू येथील विविध सेवाभावी संस्थानचे पदाधिकारी, देहू ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नितीन महाराज मोरे यांनी सुसंवाद साधून संत तुकाराम महाराज यांचे अभंग सांगत संत तुकाराम महाराज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे तत्कालीन प्रसंगावर आधारित माहिती देत संवाद साधला. संत साहित्यावर संवाद, देवदर्शन, श्री भंडारा डोंगरावर देवदर्शन, देहू परिसर दर्शन, यावेळी माहिती जाणून घेत वारकरी संत परंपरांची माहिती त्यांनी घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी शोध संस्थान एवंम राजदीप कॉलेज मिरजापूर, बनारस ( उत्तर प्रदेश ) मधील विद्यार्थी यांनी परिसर पाहत देवदर्शन करीत पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र देहू सदिच्छा भेट अंतर्गत श्रींचे दर्शन, मंदिर भेट देत येथील पुरातन, सांस्कृतिक वारसा पाहिला. या उपक्रमात छत्रपती शोध संस्थान एवंम राजदीप कॉलेज मिर्जापूर, बनारस ( उत्तर प्रदेश ) मधील विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले. मान्यवरांचे देवदर्शन झाल्या नंतर स्वागत सत्कार उत्साहात झाला. विविध मान्यवर, सेवाभावी संस्था, पदाधिकारी, वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच स्थानिक पदाधिकारी यांनी स्वागत केले. या सदिच्छा भेटीत श्री छत्रपती शिवराय व वारकरी संप्रदाय अध्ययन परंपरा जाणून घेण्यात आली. यावेळी उपस्थित संत सज्जन मान्यवर यांचेशी संवाद साधण्यात आला.




