देवेंद्र फडवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी लोणावळ्यात भाजप कडून बाप्पाला साकडं



मावळ मराठा न्युज -लोणावळा,नुकत्याच विधानसभा निवडणुकीत भाजप ला प्रचंड मोठा विजय मिळाल्याने भाजप च्या कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत याकरिता लोणावळ्यात भाजपाच्या वतीने भांगरवाडी गणपती मंदिरात महाआरती आयोजित करण्यात आली. महाआरती करत फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी श्री गणेशाला साकडे घालण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,ज्येष्ठ नेते अरविंद कुलकर्णी, आशिष बुटाला, शकुंतला इंगुळकर, अर्जुन पाठारे, पारिजा भिल्लारे, पांडुरंग तीखे, अनिल गायकवाड, शुभम मानकामे, सुरेश गायकवाड, हर्षल होगले, योगिता कोकरे,विलास इंगुळकर, महिला अध्यक्षा विजया वाळंज, उद्योजक संदीप भेगडे, माजी नगरसेविका गौरी मावकर,सचिन गुप्ता आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नुकतीच विधानसभा निवडणूक राज्यात महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात आली. त्यामध्ये भाजपाने देवेंद्र फडणवीस व चंदशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे यश संपादित केले आहे. भाजपा हा महाराष्ट्रात व महायुती मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपा कार्यकर्त्यांची भावना असल्याने लोणावळा शहरात भाजपच्या वतीने या महाआरतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सुरेखा जाधव व श्रीधर पुजारी यांनी सांगितले.सर्वच भाजप कार्यकर्त्याची देवेद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा असल्याने गणपती बाप्पाजवळ त्याबाबत साकडं घालण्यात आले.




