लोणावळा महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण २०२० बाबत जनजागृती मोहीम

मावळ मराठा न्यूज़ लोनावला , नवीन शैक्षणिक धोरण महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणावर निबंध स्पर्धा तसेच भित्तीपत्रक प्रदर्शन स्पर्धा लोणावळा महाविद्यालयात घेण्यात आली. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. ही जनजागृती मोहीम महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षा मार्फत राबविण्यात आली. ही जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रमेशचंद्र नय्यर, सचिव श्री.दत्ता पाळेकर व इतर सन्माननीय सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही.ए.पाटील व अंतर्गत गुणवत्ता पक्षाचे समन्वयक डॉ.अमर काटकर यांच्या पुढाकाराने नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थी आणि पालकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचविण्यासाठी महाविद्यालयामार्फत छोटासा प्रयत्न करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी शैक्षणिक धोरण समन्वयक डॉ. रंजूबाला नवीन , डॉ. नितीन बोडके आणि डॉ. धनराज पाटील यांचे योगदान लाभले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page