लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज यांनी कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमाला भेट देऊन केली मदत

मावळ मराठा न्युज – कामशेत,माननीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ लायन राजेशजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शना खाली लोणावळा येथील लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज टीमच्या प्रमुखांनी दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी कामशेत येथील किनारा आश्रम (वृद्धाश्रम) येथे मानसिक आरोग्य आणि वैलनेस या विषयावर दुसरा उपक्रम राबविण्यात आला. टीम लोणावळा येथील वरिष्ठांनी त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि त्यांच्या आश्रमाला त्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू आणि साहित्य दान केले. प्रीती वैद्य मॅडम यांनी विनंती केल्याप्रमाणे हे आश्रम काळजीपूर्वक आणि यशस्वीरित्या चालवतात. हा उपक्रम क्लब अध्यक्ष एमजेएफ लायन सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली आणि अ‍ॅक्टिव्हिटी चेअरपर्सन एमजेएफ ला. सुधीर जी कदम (डीसी मार्केटिंग आणि कम्युनिकेशन) यांच्या पाठिंब्याने पार पडला. या उपक्रमासाठी एमजेएफ लायन्स अमीन वाडीवाला (डीसी इमेज बिल्डिंग),लायन रंजना पुट्टोल (क्लब सेक्रेटरी),लायन छाया वर्तक (क्लब कोषाध्यक्ष) टीम उपस्थित होती.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page