लोणावळा शहर भाजपच्या बैठकीत वार्षिक अहवाल प्रकाशित करुन पक्ष प्रवेश,पदाधिकारी नेमणुका जाहीर

मावळ मराठा न्युज -लोणावळा,भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराची आज बैठक संपन्न झाली. यावेळेस सदस्य नोंदणी अभियान २०२४ शहरात राबवण्या संबंधी चर्चा करण्यात आली , तसेच शहराध्यक्ष अरुण वसंत लाड यांचा कार्याचा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला तसेच नवीन पक्ष प्रवेश करण्यात आले , व संघटनेत काही नवीन पदाधिकाऱी नेमण्यात आले , उपस्थितांमध्ये कार्याध्यक्ष सुधीर पारीठे , युवा अध्यक्ष प्रथमेश पाळेकर मा उपनगराध्यक्ष सुभाषजी सोनवणे ,मा. नगरसेवक देविदास कडु,बाळासाहेब जाधव,संजय गायकवाड, विशाल पाडाळे मा, नगरसेविका मंदाताई सोनवणे, अपर्णा बुटाला,जयश्री आहेर,गौरी मावकर,आशाताई खिल्लारे,जिल्हा उपाध्यक्षा अश्विनीताई जगदाळे , मा. शहराध्यक्ष सूर्यकांत दादा धुमाळ, बाबा शेट्टी, राजेन्द्र चौहान, जेष्ठ नेते अरविंद कुलकर्णी, अविनाश पवार , दिलीपशेठ गुप्ता सुनिलभाऊ खिल्लारे गणेश मावकर, शशीभाऊ मानकर , शैलेश कचरे , सुनील कचरे नरेंद्र कचरे , ईतर पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सरचिटणीस शुभम मानकामे यांनी केले तर प्रस्ताविक देविदास कडू यांनी केले. अध्यक्ष भाषण अरुण लाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रथमेश पाळेकर यांनी केले तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील यांनी फोनवरून उपस्थित कार्यकर्त्यां बरोबर संवाद साधुन मार्गदर्शन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page