क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९६ वी जयंती आम्ही खोपोलीकर,आमचं ठरलय संघटनेच्या वतीने साजरी

मावळ मराठा न्यूज ,खोपोली – ११ एप्रिल थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९६ जयंती निमित्त आम्ही खोपोली कर आमचं ठरलय संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ( शिळफाटा ) इथे सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुरेखा ताई खेडकर तसेच नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री. मोहन विठ्ठल केदार ह्यांनी पुष्पहार अर्पण करून नंतर आम्ही सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तसेच क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले ह्यांचा विजय असो अश्या घोषणा देऊन महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून रथयात्रेची सुरवात केली. शिळफाटा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली पर्यंत रथयात्रा काढून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे ज्येष्ठ पत्रकार श्री. दिनकर भुजबळ साहेब तसेच रायगड जिल्हाध्यक्ष ग्राहक मंच श्री. संजय पाटील ह्यांनी पुष्पहार अर्पण करून आम्ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचा विजय असो अश्या घोषणा देऊन सांगता केली. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले ह्यांच्या बद्दल बोलताना श्रीमती सुरेखा ताई खेडकर ह्यांनी आपल्या सर्वांच्या जडणघडनेत त्यांचे खूप मोठे मोलाचे कार्य आहे व आपण ह्या महापुरुषांना विसरलो आहोत अशी शोकांतिका बोलून दाखवली. महात्मा फुले ह्यांनी सावित्री बाई फुले ह्यांना बरोबर घेऊन महिलांसाठी केलेले कार्य व आज इथे सर्व पुरुष एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असताना सुद्धा एक स्त्री म्हणून मला बोलण्याची संधी मिळाली ती त्यांच्यामुळेच. आज महिलांना शिकवले शिक्षित केले म्हणुच सर्वत्र सर्व ठिकाणी महिला कार्येरत आहेत व राजकारणात ही आज राष्ट्रपती पदी नियुक्त आहेत. समाजाला जातिव्यतेतून, स्त्री-पुरुष भेदभाव, वर्णभेद यासारख्या जुन्या चालीरीती मोडीत काढून समाजामध्ये क्रांती घडवून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अनेक चटके सहन केले आहेत. आज आपण भर उन्हात ऊभे असताना आपल्या पायाना चटके बसत आहेत व ते आपण सोसू शकत नाही मात्र त्यांनी समाजाला अनिष्ट रूढी परंपरे पासून बाहेर काढण्यासाठी किती चटके सोसावे लागले असतील ह्याचा विचार ही करवत नाही असे सांगितले.माजी नगर सेवक श्री. किशोर पानसरे ह्यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन केल्याशिवाय उद्धार नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक वेळेस सांगत आले आहेत व त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे. आज समाजातील सर्व मुली ५० % आरक्षण तसेच शिक्षणाच्या जोरावर सर्वत्र उच्पदावर कार्यरत आहेत व हे सगळे योगदान महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री बाई फुले ह्यांच्या मुळे आहे असे सांगितले. श्री. हेमंत नांदे ह्यांनी महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचा जन्म हा खऱ्या अर्थाने स्त्रियांसाठी झाला असे सांगून त्या काळी महिलांना घरा बाहेर सुद्धा निघू देत नवथे त्यावेळी त्यांनी त्यांना घरा बाहेर काढून शिकवले व त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले असे सांगितले. श्री. प्रदीप मोरे ह्यांनी आम्ही खोपोली कर आमचं ठरलय संघटनेच्या वतीने सर्वांना महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व अश्या ह्या थोर समाजसुधारक महापुरुषांनी आपल्यावर समाजरक्षणाचे संस्कार घालुन दिलेले आहेत, त्यांचे विचार आदर्श आस्मसात करून जयंती साजरी केली पाहिजे असे सांगितले. खोपोली पोलिस स्टेशन मार्फत परवानगी दिली तसेच काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना ही केल्या ट्रॅफिक जाम, ध्वनी प्रदुषण व इतर कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या तसेच कार्यक्रमासाठी शुभेच्या देताना अश्या ह्या सर्व महापुर्षांचे आदर्श डोळ्या समोर ठेऊन काम करा हे ही सांगितले त्या बद्दल त्यांचे तसेच केलेले सहकार्य त्यासाठी मनापासून धन्यवाद. शाहिद शफी शेख मिरवणूक साठी रथ ज्यांच्या मुळे जयंतीला शोभा आली त्यांनी स्पिकरवर महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचे कार्य नागरिकांपर्यंत पोहचविले सदर कार्यक्रमासाठी श्री. मोहन विठ्ठल केदार, ज्येष्ठ पत्रकार श्री. दिनकर भुजबळ, श्री. मोहन केदार, श्रीमती सुरेखा ताई खेडकर, श्री. संजय पाटील, श्री. ज्ञानेश्वर गायकवाड, श्री. दिनकर भुजबळ, श्री. संदीप वाघमारे, माजी नगर सेवक श्री. किशोर पानसरे श्री. प्रदीप मोरे, श्री. प्रफुल गायकवाड, श्री. गणेश राक्षे, श्री. अशोक मोरे, श्री. ईश्वर कासार, श्री. हेमंत नांदे, श्री. राकेश शेलार, श्री. तोफिक करंजीकर, श्री. शाहिद शफीक शेख, श्री. इंद्रसेन घोडके, पत्रकार श्री. प्रसाद अटक, श्री. संदेश धावारे, श्री.अमोल वाघमारे, श्री. संदेश माने, श्री. रविंद्र अवथंनकर, कु. अक्षय सकपाळ, कु. मुस्तफा शेख, श्री. महेश काजळे उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page