शिकेल तो टिकेल,विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव द्या- अण्णा जोगदंड

मावळ मराठा न्युज :-चिंचवडभारतात २६ जानेवारी हा दिन ७५ वा प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर भारतामध्ये संविधान दिन लागू झाला. तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. संविधानामध्ये कोणतीही जात, धर्म, पंथ, लिंग, उच्च, नीच असे नाहीत अशी संविधानात रचना करण्यात आली आहे, सर्व धर्म समभाव हीच संकल्पना करण्यात आली आहे. यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले. आज आमचे भाग्य आहे की या अपंग शाळेमध्ये द्धजारोहन करण्याचा मान मिळावा या शाळेतील मुले खूप हुशार आणि मेहनती असून यामध्ये अनेक विद्यार्थी पुढच्या काळात जिल्हाधिकारी तहसीलदार ,अशावेगवेगळ्या उच्च पद पदावर निश्चित जाणार आहेत.मुलांमध्ये चिकाटी ,ध्येयवादी वृत्ती असली पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शाळेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघमोडे आपणास सर्वांना स्वतःच्या अपंगत्वावर मात करून तुम्हाला उच्च शिक्षण देण्याचे ठरले आहे .यासाठी झगडताना आपण पाहतोय, एक सेवानिवृत्त अपंग कामगार हे अपंगा मुलांसाठीच शाळा चालवतात हे आपल्या सर्वासाठी भुषनावह आहे फार मोठे आहावात्म काम आणि जिकरीचे काम आहे मुलांच्या वेदना काय आहेत याची जाणीव त्यांना आहेच अनेक दानशुरांनी या शाळेसाठी देणगीरुपी दान देण्याचे आव्हान यावेळी जोगदंड यांनी केले.यावेळी. संस्थापक विश्वनाथ वाघमोडे म्हणाले की माझी ताकद माझी. मुले आहेत, मला जेष्ट समाजसेवक आण्णा हजारे याचा आशीर्वाद आहे, आजकाल समासजसेवेच्या नावाखाली वसुलीचे काम काही संस्था करतात अशी खंत व्यक्त करुन यामुळे आमच्या सारख्या आदर्श संस्था मागे पडतात.मला समासेवेची प्रेरणा माझे मोठे बंधू कै लक्ष्मण वाघमोडे यांच्या कडून मिळाल्याचे सांगितलेयावेळी. मुलांनी देशभक्तीपर गीते गाऊन सर्वांची मने जिंकून घेतली काही मुलांनी एका पायावर नृत्य करून आम्ही मंत्रमुक्त झालो.असे सुरेश कंक म्हणाले.यावेळी अपंग विद्यालय निगडीचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघमोडे, जेष्ट साहित्यिक सुरेश ककं, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती चे अध्यक्ष आण्णा जोगदंड,,सुभाष चव्हाण, गुणवंत कामगार भाऊसाहेब गायकवाड, गुणवंत कामगार संगिता जोगदंड, प्रकाश वीर,मुरलीधर दळवी, संस्कार प्रतिष्टानचे मनोहर कड ,संस्कृती कड,अमोल लोंढे,पुरूषोत्तम सदाफुले,एकनाथ उगले,मच्छिंद्र कदम ,सतिश देशमुख, वैशाली खुडे, सुधाकर खुडे सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page