सचिन काळे युवा मंचची विद्युत पोल उभारण्याची आळंदी नगरपरिषदे कडे मागणी



मावळ मराठा न्युज -पुणे, चऱ्होली येथील काळे काँलनीमध्ये सचिन काळे युवा मंचच्या वतीने आळंदी नगर परिषदेच्या विद्युत विभागाचे अभियंते विष्णूकुमार शिवशरण यांच्याकडे लेखी निवेदन देऊन विद्युत खांभ उभारण्याची मागणी केली आहे. काळे कॉलनी गेल्या १० वर्षापासून काही भागात विद्युत खांब नसल्याने नागरिकांमध्ये रात्रीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्री रस्त्यावर लाईट नसल्यामुळे महिलांना रस्त्यावर ये जा करता येत नाही. अनेक विद्यार्थ्यांनी संध्याकाळी शिकवणीसाठी घराबाहेर ये- जा करत असतात .काही टवाळखोर मुले त्या ठिकाणी विद्यार्थिनी छेडछाड करतांना नागरिकांना पाहायला मिळाले. यावेळी नगरसेवक अँड. सचिन काळे म्हणाले की मी वारंवार नगर परिषदेच्या विद्युत विभागाच्या अभियांत्यांना तोंडी वारंवार कल्पना दिली आहे. पण ते गांभीर्याने घेत नाहीत.मग महिला व विद्यार्थिनीवर अमाणूस अत्याचार रस्त्यावर झाल्यावरच नगरपरिषदेला जाग येईल का ? असा उद्दीग्न प्रश्न काळे यांनी विचारला आहे. काही चुकीचे घडल्यास आम्ही विद्युत विभागाच्या विरोधात जनआंदोलन उभ करून जाब संबंधित अधिकार्याला विचारू असेहीं काळे म्हणाले. यावेळी नगरसेवक अँड सचिन काळे ,युवा नेते मंगेश काळे उपस्थित होते.




