मराठी पत्रकार परिषद,मुंबई पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न मावळ तालुका पत्रकार संघातील पत्रकारांना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले विमा सुरक्षा कवच








मावळ मराठा न्यूज – वडगांव,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न मावळ तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकारांना मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून विमा सुरक्षा कवच देण्यात आले यावेळी आमदार सुनिल शेळके यांचे बंधू उद्योजक सुधाकर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यकामाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक श्री. विजय सुराणा यांनी केले. आमदार सुनील आण्णा शेळके यांचे बंधू तथा युवा उद्योजक श्री. सुधाकर शेळके यांचा मावळ तालुका पत्रकार संधाच्या वतीने शाल पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जेष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक श्री अॅड. संजय पाटील यांनी विमा सुरक्षा कवच दिल्याबद्दल शेळके यांचे आभार मानले.राज्यातील ३५ जिल्हे आणि जवळपास ३४० तालुक्यात परिषदेच्या शाखा विस्तार झालेला आहे. प्रिंट मीडिया चे ८ हजारांवर आणि डिजिटल मीडिया चे ४ हजार पत्रकार असे १२ हजार सभासद असलेली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही सर्वात जुनी आणि मोठी संघटना आहे असे मत व्यक्त केले.मनोगत ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक श्री. अमिन खान यांनी वर्षभर मावळ तालुका पत्रकार संघ काय आणि कोणत्या क्षेत्रात काम करणार याची माहिती दिली.अध्यक्षीय मनोगत कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री. सुधाकर शेळके यांनी नजीकच्या काळात मेडिक्लेम सुद्धा काढण्याचा मानस आमदार सुनील शेळके यांचा आहे असे मत व्यक्त केले.आभार प्रदर्शन अध्यक्ष श्री. सचिन ठाकर यांनी मानले. तर सूत्रसंचालन योगेश घोडके यांनी केलं



