महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे कुसगाव डोंगरगाव येथील ग्रामस्थ त्रस्त,उद्या आंदोलन



मावळ मराठा न्युज -लोणावळा,कुसगाव-डोंगरगाव पाणी पुरवठा योजनेचा पूर्ण बट्याबोळ झाला असून कुसगाव डोंगरगाव येथील पाण्याचा टंचाई नें कुसगाव आणि डोंगरगावचे ग्रामस्थ त्रस्त असून कुसगाव ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा करुन देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन आणि ठेकेदार आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे परंतु यात ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागच्यावेळेस देखील ग्रामपंचायतीने प्राधिकरण विरोधात कारवाई आणि आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु त्यावेळेस आमदार सुनील शेळके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना मुदत वाढवून दिली होती आता ती मुदत संपवून देखील सहा महिने झाले तरी प्राधिकरण कोणतीही कार्यवाही करत नाही त्यामुळे ग्रामस्थांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राहिलेले काम पूर्ण करत नसल्याने आता उद्या दिनांक ९ डिसेंबर,सोमवारी सकाळी १०.३० वाजता ओळकाईवाडी चौक येथे प्राधिकरण आणि ठेकेदार यांच्या विरोधात ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलन व उपोषणाचा इशारा दिला आहे. तरी सदर आंदोलनात कुसगाव,डोंगरगाव येथील ग्रामस्थाना पाण्याचा त्रास सहन कराव्या लागणाऱ्या सर्व महिला, बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा जाब प्राधिकरणा विचारण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन कुसगाव ग्रामपंचातीचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी केले आहे.




