लोणावळा वुमेंस फॉउंडेशन आयोजित “स्वतंत्र महिला” या महिला सबलीकरण शिबिराला प्रचंड प्रतिसाद

लोणावळा:- लोणावळा वुमेंस फॉउंडेशन आयोजित स्वतंत्र महिला या विषयावर लोनावला व् परिसरातील महिला आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर येथील हॉटेल चंद्रलोक येथे आयोजित करण्यात आले.यावेळी लोणावला उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक आय पीएस सत्य साई कार्तिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर स्वतंत्र महिला आणि महिला सबलीकरण शिबिराला महिलानी प्रचंड प्रतिसाद दिला ,यावेळी व्यासपीठावर सत्यसाई कार्तिक, पुणे ग्रामीण च्या पोलिस अधिकारी देशमुख आणि आयोजक ब्रिंद्रा गणात्रा उपस्थित होत्या.यावेळी महिलाना आपल्या जीवनात कोणतीही अडचण आली तर कोणतीही भीति न बाळगता थेट पोलिसांशी संपर्क करा ,आम्ही आपल्या सेवेसाठीच आहोत याची ग्वाही दिली ,तर पोलिस अधिकारी सौ देशमुख यांनी महिलासाठी असणाऱ्या भारतीय दंड संहिता मधील कलमची माहिती आणि महिला अत्याचार बद्दल असणाऱ्या सर्व कायद्याची माहिती सोप्या भाषेत दिली .यावेळी महिलांच्या आणि तरुणी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाना सत्यसाई कार्तिक आणि सौ देशमुख यांनी उत्तरे दिली .त्यामुळे सर्व महिलांच्या क़ायदेविषयक समस्यांचे समाधान झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आंनद दिसत होता .यावेळी आयोजक बिंद्रा गणात्रा यांनी प्रमुख पाहुने आणि उपस्थित पोलिस कर्मचारी यांचा यथोचित सन्मान केला. आणि सत्यसाई कार्तिक यांच्या कामाचे कौतुक करत हेच खरे सिंगम आहेत सांगत त्यांचा गौरव केला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page