आण्णा जोगदंड यांना राज्यस्तरीय “मानवधिकार कार्यकर्ता” पुरस्कार

मावळ मराठा न्युज -पिंपरी,जागतिक मानवधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती व जाधवर ग्रुप तसेच पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहलाल नेहरू घोले रोड येथे जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त जिल्हा सत्र न्यायमूर्ती महेंद्र के.महाजन व जेष्ट समाजसेविका मेधाताई पाटकर, घटना तज्ञ उल्हास बापट यांच्या हस्ते सन्मान चिन्ह ,संविधान देऊन मानवधिकार कार्यकर्ता पुरस्कार आण्णा जोगदंड यांना देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्यभरातील विविध  क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश महिंद्र के. महाजन म्हणाले की या संस्थेचे काम खूप चांगले आहे. संस्थेच्या कार्याचा अभ्यास करून मी अध्यक्षपद स्वीकारले आहे. ही संस्था इतर संस्थांना बळ देण्याबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांना ही बळ देण्याचे काम करत आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे यामुळे कार्यकर्त्याचे मनोबल निश्चितच वाढेल या शंका नाही.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर म्हणाल्या  की सामाजिक काम तेवढे सोपे राहिलेले नाही अनेक कार्यकर्त्यावर सामाजिक काम करत असताना खोटे गुन्हेही दाखल होतात यामुळे तुम्ही तुमचे मनोधैर्य खचून न जाता वंचित समाजासाठी,अत्याचारी,पिढीतासाठी आधिकच तीव्रतेने काम करीत रहा यश तुम्हाला निश्चितच मिळेल यात शंका नाही.संघर्ष करा ,संघटित व्हा.आणि त्यांना न्याय द्या असे आव्हान त्यांनी केले आहे .यावेळी संस्थाध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले की काही वर्षांपूर्वी धर्मादाय आयुक्ताने न्यायालयात दावा दाखल केला होता की “भ्रष्टाचार निर्मूलन समिती व ह्यूमन राईट हा शब्द महाराष्ट्रातील प्रत्येक संस्थेने आपल्या नावातून वगळावा याविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली होती दोन दिवसापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने सांगितले की “नावात काय आहे? संस्थांची कामे बघा, चुकीचे काम असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा पण चांगल्या संस्थांचा विचार करा असे म्हणून तो निर्णय रद्द ठरवण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील हजारो संस्थांना दिलासा मिळाल्याचे  विकास कुचेकर यांनी सांगितले.यावेळी आण्णा जोगदंड म्हणाले की हा पुरस्कार माझा नसून सर्वांनी केलेल्या सांघिक सामाजिक कामाची मला पावती मिळाली आहे. राज्यातून एक मानवधिकार कार्यकर्ता निवडुन त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना  मानवधिकार कार्यकर्ता पुरस्कार दिला जातो .जोगदंड म्हणाले कि हा सन्मान मला मिळाल्याने मी अधिकच कार्यक्षमतेने सामाजिक काम करेल आणि संस्थेच्या कोअर कमिटीने दाखवलेला माझ्यावर विश्वास मी सार्थ ठरवेल.यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र के.महाजन ,ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर,भारतीय घटना तज्ञ डॉ.उल्हास बापट,दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश जे .डि. पाटील ,राम पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर ,अखिल भारतीय प्राचार्य फेडरेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधव,सहा.आयुक्त संतोष जाधव,वृक्ष मित्र महाराष्ट्र शासन अरुण पवार, यशदाचे प्रमुख डॉ.बबन जोगदंड, सचिन कानडे,अँड शार्दुल जाधववर उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महिला अध्याक्षा मीना करंजावणे,पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड ,युवक अध्यक्ष अतिश गायकवाड, कार्याध्यक्ष, गजानन धाराशिवकर,बाळू कुचेकर,सचिव मुरलीधर दळवी, खेड ता. अध्यक्ष शंकर नानेकर ,मुंबई अध्यक्ष शकील शेख,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अब्बास शेख,सोमनाथ सावंत, मनिष देशपांडे, चित्रा कुचेकर,आण्णा मंजुळे,आकाश भोसले, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, प्रकाश बोदाडे,अक्षय दळवी, विकास शहाणे,पंडित वनसकर,राहुल शेंडगे, पिलानी घाटे,नंदकिशोर ढसाळ,लक्षण जोगदंड, जाई जोगदंडसर्व कमिटी पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Chat with us