एकनाथ शिंदेला देऊन किकअजितदादांना मिळणार मुख्यमंत्रीपदाची गिफ्ट ?भाजपाची नवी रणनीती – दिलीप मालवणकर

मावळ मराठा न्यूज:- ठाणे,सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची तिथी अद्याप जाहिर झालेली नाही.परंतू एक्झिट पोलच्या धर्तीवर एक्झिट निकाल सुरू झाला आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल याचे अंदाज नेटकरी व कायदेतज्ज्ञ देऊ लागले आहेत. या नुसार एकनाथ शिंदेंची विकेट पडणार असून महाराष्ट्रात नवीन आघाडीचे खिचडी सरकार अस्तीत्वात येणार आहे, अशी परिस्थिती दिसून येत आहे.राष्ट्रवादी काॅंग्रेसने अचानक भाजपधार्जिणे धोरण अवलंबले आहे.अडानी प्रकरण असो, सावरकर प्रकरण असो की इव्हिएम प्रकरण असो, राष्ट्रवादीचा आत्ता नूर बदलला आहे. आणि त्याची बक्षिसीही लगेच मिळाली.अजितदादा पवार व त्यांच्या पत्नीवरील जरंडेश्वर साखर कारखान्यातील मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी इडीने क्लिनचिट दिल्याचे तत्परतेेने जाहिर झाले. भाजपाला महाराष्ट्रातील सत्ता व त्यावरील पकड टिकवायची आहे.त्यासाठी एकनाथ शिंदे व त्याच्या ४० आमदारांना फोडून वापर केला.आत्ता त्यांची सद्दी संपली व सर्वोच्च न्यायालाच्या निकालाने हे मिंधे रद्दीत जमा होणार ! अशी शक्यता निर्माण होताच भाजपाने मिंधेगटाच्या अपात्र होऊ शकणा-या आमदारांची रिप्लेसमेंट राष्ट्रवादीचे आमदार फोडून करायची आहे. त्यासाठी औट घटकेचे उपमुख्यंत्री झालेले अजितदादा पवार व त्यांच्या आमदारांना गळास लावण्याचे षडयंत्र भाजपाने रचले आहे. एकनाथ शिंदे प्रमाणेच अजित दादा पवारांना इडीची भीती व नंतर क्लिनचिट देत फोडण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री पदाचे दीवा स्वप्न साकार करण्यासाठी अजितदादा पवार हे आपली राजकिय आत्महत्या करण्यास धजावले तर ती मोठी दुर्दैवी घटना ठरेल व महाराष्ट्राच्या इतिहासाला कलंकित करणारी असेल.भाजपा हा पक्ष लोकशाही व संविधानाचा मारेकरी म्हणून बदनाम होत आहे. निवडून आलेल्या आमदारांच्या बळावर सरकार स्थापन करण्याऐवजी शासकिय यंत्रणांचा गैरवापर करून दबाव, ब्लॅकमेलिंग करून फोडलेल्या आमदारांच्या जीवावर सरकार स्थापन करण्याचा घातक पायंडा जन्मास घालत आहे. यापुढे निवडणूक न लढवता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना विकत घेऊन सत्ता संपादन करण्याची प्रथा निर्माण झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. आधी एकनाथाला बळीचा बकरा केला आत्ता अजितदादा पवारांना बळीचा बकरा बनवणार का ? व अजितदादा बळीचा बकरा बनले तर ते महाराष्ट्र, राष्ट्रवादी व अजितदादांच्या दृष्टिने दुर्दैवी ठरेल. या सर्व प्रकारात राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार हे हतबल व निष्प्रभ झालेले दिसत आहेत.ते म्हणतात- कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही,पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे.कोणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न पण पक्ष म्हणून आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही. शरद पवारांचे हे वाक्य त्यांची हतबलता दर्शवत आहे.मात्र जे भाजपात जातील त्यांना राष्ट्रवादीची दारं कायमची बंद होतील, असे जर बाणेदारपणे बोलले असते तर त्यांच्याबद्धलचा आदर किती तरी पटीने वाढला असता.शरद पवारांचे हे वक्तव्य फुटीरांना मुकसंमतीदेण्यासारखे वाटते.काहीही झाले तरी एका गोष्टीचा महाराष्ट्राला व निष्ठावंतांना नक्कीच आनंद होईल की, पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करणा-यांना जन्माची अद्दल घडेल व त्यांचे तोंड कायमचे काळे होईल. भाजपा हा सत्तापिपासू पक्ष आहे त्याला कितीही बळी गेले तरी हरकत नाही परंतू सत्ता हस्तगत झाली पाहिजे, ही पाशवी वृत्ती आत्ता उघड झाली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page