लोणावळ्यात फिरतोय तोतया वकील,अनेक अशिलांना घालतोय गंडा



लोणावळा :- अम्बी व्हॅली परिसरात राहणाऱ्या एका तोतया वकिलाने या तीन चार महिन्यापासुन १० वी,१२ वी चे सुद्धा शिक्षण नसताना थेट खोटी लॉ ची डिग्री घेऊन सर्रास वकील म्हणून मिरवत आशिलांची फसवणूक करीत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहिती नुसार २०२२ सालापर्यंत आंबावणे येथील एका खाजगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला असणाऱ्या या तोतया वकिलाने आता पर्यंत लोणावळा आणि वडगांव येथे वकिलाचा मिजास दाखवून अनेकांना गंडा घातला आहे. तरी सर्व नागरिकांना मावळ मराठा न्युज तर्फे आवाहन करण्यात येते की सदर तोतया आणि बनावट वकिलापासून सावध राहावे,त्यांचा पडदा लवकरच जनते समोर आणि बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे अध्यक्ष श्री राजेंद्र उमाप यांच्या कडे देखील तक्रार करून उघड करणार आहोत.




