रोटरीक्लब तळेगाव दाभाडे व कांती मोती संघवी परिवारच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर व्याख्याने संपन्न

मावळ मराठा न्यूज – तळेगाव,रोटरीक्लब तळेगाव दाभाडे व कांती मोती संघवी परिवारच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर व्याख्याने त्यात प्रमुख व्याख्याते म्हणून ज्येष्ठ लेखक वक्ते प्राध्यापक विजय नवले,डाॅ शाळीग्राम भंडारी,प्राध्यापक राजेंद्र पवार , श्री सतीश पाटील व डॉ समीक्षा गायकवाड होते.आदर्श विद्यामंदिर तळेगाव (नगरपालिकेच्या दोन्ही शाळांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसह) आणि शहा अग्रो टुरिझम येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजितकरण्यात आली. या संपूर्ण कार्यशाळेच आयोजन, नियोजन रो.सीए विलास शहा यांनी केलं. कार्यक्रमाचे शेवटी” योग” ह्या पुस्तकांचे तसेच डॉ शाळीग्राम भंडारी ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना सढळ हस्ते करण्यात आले. तळेगाव दाभाडे रोटरी प्रेसिडेंट कमलेश कार्ले ,सेक्रेटरी प्रमोद दाभाडे,रो. यादवेंद्र खळदे,रो. विलास जाधव,रो.मेंथे ,रो.संजय अडसूळ,रो. कीर्ती मोहरीर व फोटोग्राफीची महत्वाची जबाबदारी पार पाडणारे रो.मथुरेकाका तसेच चारही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग,चांदखेड च्या सरपंच मीनाताई आगळे आणि रो.अड विजय शहा ,वर्तिका व प्रशांत शहा या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळेच हे अभियान आम्ही १०० % यशस्वी करू शकलो- या विनम्र शब्दात विलास भाईंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात! दहावीच्या विद्यार्थ्यांनी उर्वरित काळात दडपण मुक्त व नियोजनबद्ध अभ्यास करणे व आपल्या गुणांमध्ये भरघोस वाढ करणे हा या प्रकल्पाचा एकमेव उद्देश होता आणि तो १०० % सफल झाला!सदर उपक्रम हा तळेगाव नगरपरिषदेच्या पहिल्या दहावीच्या बॅच पासून अर्थात २०१६/१७ पासून रोटरी क्लबच्या माध्यमातून विलास शहा राबवित आलेले आहेत. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे ने नगरपालिका शाळेला ह्या वर्षी बुक लायब्ररी उपलब्ध करून दिली व दहावीच्या पहिल्या तीन क्रमांकाच्या साठी बक्षिसे जाहीर केली आहेत. तसेच चांदखेड येथील शाळेसाठी शहा बंधूंनी बक्षिसे जाहीर केली! न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड च्या वीरेंद्र प्रसाद जाधव सरांनी आभार मानल्यानंतर रुचकर अल्पपोहाराने या कार्यशाळेची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page