प्रकाश पोरवाल यांचे विरोधात अखेर किरीट सोमय्या यांनी केली लोणावळा शहर पोलिस स्टेशनला तक्रार

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल राहणार एकवीरा निवास,भुशी गाव लोणावळा यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सोबतचा फोटो सोशल मीडियावर दिनांक ६ /१२ /२०२२ रोजी व्हायरल केला होता त्यात त्यांनी लॅऺड माफिया युसुफ लकडावाला याचा हस्तक नितीन अगरवाल बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन बाबत किरीट सोमय्या यांच्या निवास स्थानी चर्चा झाली,आणि सदर प्रकरणामध्ये संपूर्ण माहिती घेवून ते पुढील कारवाई करणार आहेत असे आश्वासन दिले अश्या प्रकारचा मजकूर प्रसारित करून नितीन अगरवाल यांचे युसुफ लकडावाला यांचेशी कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचा पुरावा नसताना फिर्यादी किरीट सोमय्या यांचे सोबतचा फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करून सोमय्या आणि नितीन अगरवाल यांची अब्रू नुकसानी होईल असे कृत्य केले आहे. तक्रार अर्ज नंबर १८३२/२०२२,१८१/२०२२, १८३१/२०२२,आणि १८१८/२०२२ लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे एन सी आर मध्ये भारतीय दंड विधान कलम ४९९ ,५०० नुसार दिनांक २०/१२/२०२२ रोजी ७७०/२०२२ केली आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page