आदर्श विद्या मंदिरात लायन्स क्लबमार्फत शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज- तळेगाव दाभाडे-येथे ‘दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी’ लायन्स क्लब तळेगाव तर्फे ,आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे येथील ११० शिक्षकांना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून,भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. माध्यमिक शिक्षकानी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. राजेंद्र झोरे यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले . त्यांनी आपल्या भाषणात लायन्स क्लबच्या वतीने शिक्षकांना सन्मानित करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे असे नमूद केले .मावळ शिक्षण प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष श्री.नंदकुमार काळोखे व सहसचिव प्रा.वसंत पवार यांनी संस्थेच्या प्रगतीचा व कार्याचा आढावा घेतला व शिक्षकांविषयी गौरवोद्गार काढले. शिक्षकांमुळे संस्थेचा शिक्षण दर्जा सतत उंचवतो आहे असे आवर्जून सांगितले. .लायन महेश भाई शहा यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले . उद्योजिका सीमा कांचन (कदम) यांनी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवताना ते आपल्या ज्ञानने ,प्रेमाने आणि संस्काराने त्यांचे जीवन उजवळतात असे सांगितले. उपस्थितांमध्ये विभाग प्रमुख, पूर्व व प्राथमिक :सौ प्रतिज्ञा मांडे , माध्यमिक :श्री संतोष खामकर ,उच्च माध्यमिक: श्री संजय देवकर, सा. फुले महिला महाविद्यालय: सौ. माधुरी चंदनशिव हे उपस्थित होते. प्रा. अंकलेश निसर्गंध यांनी स्वरचित गीत सादर केले .सेविका सौ.घोडके यांनी शिक्षक दिनपर गीत सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रशांत गुंड यांनी केले .आभार प्रदर्शन सौ. प्रतिज्ञा मांडे यांनी केले. लायन भरत पोद्दार लायन सुनील वाळुंज लायन डॉ. अनिकेत काळोखे लायन प्रमिला वाळूंज व सौ कुमुदिनी झोरे आदि मान्यवर उपस्थित होते .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page