लायन्स इंटरनॅशनल च्या डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ मधील रीजन तीनचे विभागीय अध्यक्ष ला.अनिल झोपे यांच्या उपस्थितीत शिवगर्जना विभागीय परिषद संपन्न

मावळ मराठा न्यूज:- पुणेलायन्स इंटरनॅशनल च्या डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ मधील रीजन तीनचे विभागीय अध्यक्ष ला.अनिल झोपे यांच्या शिवगर्जना विभागीय १६ एप्रिल, मधुरा लॉन, पूनावळे येथे आयोजन केले होते. या परिषदेची गर्जना अवघ्या पंचक्रोशी दुमदुमली.कार्यक्रमाची सुरुवात कु. शिवानी पाटील व कु. मृणाल चौधरी यांच्या नेत्र सुखद गणेश वंदनाने झाली.त्यानंतर थ्रिलर डान्स अकॅडमी तर्फे शिवगर्जना या विषयावर आधारित जोश पूर्ण नृत्य सादर झाले.विभागीय चेअरमन अनिल झोपे यांनी उपस्थिताचे स्वागत केले व परिषदेचे उदघाटन माननीय प्रांतपाल राजेश कोठावडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख वक्ते व्माननीय इंद्रजीत देशमुख यांचे विचार अप्रतिम व श्रवणीय होते. त्यांच्या भाषणामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यात समोरून तरळून गेला.व्यासपीठावर सन्माननीय अतिथी माझी प्रांतपाल बाळकृष्ण जोशी तसेच माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा, प्रांताची पहिली महिला संध्या कोठावदे, रीजनची पहिली महिला राखी झोपे, झोन चेअर पर्सन अंशुल शर्मा, सुदाम भोरे, गणेश शेटे व सुधीर कदम उपस्थित होते.रिजन मधील १६ क्लब मध्ये वक्तृत्व , सेक्रेटरी लेखी परीक्षा, लायन्स क्विझ, फोटो बोर्ड स्पर्धा, बॅनर प्रेझेंटेशन इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.दोन सेवा कार्य करण्यात आली वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र यांच्या मुळशी तालुक्यातील माले गावी असलेल्या मुलींच्या वसतिगृहाला दहा बेड भेट देण्यात आले तसेच सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या ओलावा वृद्धाश्रमाला एकवीस हजार रुपयाची ची रक्कम दान करण्यात आली.संपूर्ण कार्यक्रम सूनियोजित अतिशय अखिव,रेखीव झाला. 500 पेक्षा जास्त उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यात परिषदेचे निमंत्रक कृष्णाजी कुलकर्णी अध्यक्ष निलेश पाटील, सेक्रेटरी राजेश हिंदळेकर, खजिनदार प्रमोद चौधरी, तसेच सर्व झोन चेअरमन आणि एकूणच टीम यांचा मोलाचा वाटा होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन प्रा. शैलजा सांगळे व प्रा. दिगंबर ढोकळे यांनी केले. आभार प्रदर्शन कृष्णाजी कुलकर्णी यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page