कलापिनी बाल नाट्य शिबिराचे उत्साहात आणि जल्लोषात उद्घाटन








मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे,कलापिनी आयोजित बाल नाट्य शिबिराचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ अनंत परांजपे, अंजली कऱ्हाडकर आणि अशोक बकरे यांच्या हस्ते नटराज पूजन करून शिबिराची सुरुवात झाली.
शिबिर मार्गदर्शक, सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि लेखिका अंजली कऱ्हाडकर यांनी पालकांशी संवाद साधताना मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात संस्कार, सर्जनशीलता आणि संवादकौशल्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी डॉ. परांजपे यांनी कविता आणि कथा सांगत उपस्थित पालकांशी संवाद साधला. त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे शिबिराच्या उद्दिष्टांची दिशा स्पष्ट झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना परगी यांनी केले.
या उद्घाटनप्रसंगी मधुवंती रानडे, केतकी लिमये, सुप्रिया खानोलकर, मधुवंती हसबनीस, सुचिता कुलकर्णी, स्वाती इंगळे, नंदिनी काळे आदी उपस्थित होते. रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे तसेच स्वास्थ्ययोगी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण स्वरूप लाभले.
बालकांच्या सुप्त गुणांना वाव देत आत्मविश्वास, अभिव्यक्ती आणि सुसंस्कार यांची जोपासना करणाऱ्या या शिबिराच्या प्रारंभाने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



