शिवसेवा प्रतिष्ठान,लोणावळा यांच्या वतीने वृक्षारोपण व वृक्ष दतक अभियान

मावळ मराठा न्युज :-मावळ,पर्यावरणाचा एकीकडे ऱ्हास होत असताना शिवसेवा प्रतिष्ठान सारख्या सामाजिक बांधिलकीतून पर्यावरणाचा समातोल राखला जावा, पक्षी प्राणी यांना अन्न त्यासोबतच माणसाला शुद्ध ऑक्सिजन मिळावा या उद्देशाने आज रविवार दिनांक २३ जून २०२४ रोजी शिवसेवा प्रतिष्ठान वर प्रेम करणारे वृक्षप्रेमी सकाळी नऊ वाजता पवन मावळातील येळसे या गावी एकत्र जमले.यामध्ये पुणे, मुंबई तसेच मावळ तालुक्यातील अनेक कार्यकर्ते एकत्र आले.येळसे गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी सुद्धा सहभाग घेतला.श्री नवनाथ ठाकर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. वृक्षारोपणासाठी योग्य जागा शोधून त्या ठिकाणी खड्डे घेण्याचे काम आधीच करून ठेवले होते. तसेच सर्व पाहुण्यांसाठी चहा नाष्ट्याची व्यवस्था सुद्धा गावकऱ्यांनी आनंदाने व अत्यंत चांगल्या पद्धतीने केली होती. शिवसेवा प्रतिष्ठानचा हा दरवर्षीचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम. पावसाळ्याचे आगमन लक्षात घेऊन हा कार्यक्रम करण्याचे नियोजन या वर्षी पवन मावळात केले. वृक्षारोपण करण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठानने अत्यंत काळजीपूर्वक झाडांची निवड केली होती. सर्व देशी झाडे जसे आंबा, जांभळ फणस,जाम,कडुलिंब, बेल ,चिंच,वड,पिंपळ या झाडांची प्रामुख्याने निवड केली. या सर्व झाडांवर वेगवेगळे पक्षी आनंदाने घरटी करतात व नांदतात. त्यांना त्यांचे अन्न या झाडांपासूनच मिळते. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.मुंबईहुन अँड. ऋतुजा आंबेकर तसेच पुण्याहुन श्री मिलिंद भणगे, लोनावळ्यातुन ऍड.संजय वांद्रे, दत्तात्रय येवले, मनोज लऊळकर तसेच शिवसेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते संचालक सहभागी झाले होते…हा कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. सर्व ग्रामस्थांनी अत्यंत काळजीने झाडांचे संवर्धन करू असे आश्वासन दिले. लोणावळ्यातील कारखानदार राजीव देशपांडे यांच्या सहकार्याने येळसे या गावातील जिल्हा परिषद शाळेचे कंपाउंड चे काम शिवसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. शिवसेवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले. शिवसेवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री धनंजय चंद्रात्रे , प्रमोद देशपांडे , राजेश कामठे , राजेश येवले, भगवान गायकवाड व शिवसेवा प्रतिष्ठान चे सर्व सभासद यांनी अथक परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page