आनंद जेष्ठ नागरीक संघ पोस्टल कॉलनी यांचा योग वर्गाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मावळ मराठा न्यूज – जेष्ठ नागरिक शारीरिक आणि मानसिक दृष्टीने सुदृढ रहावे. त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आनंद जेष्ठ नागरिक संघाने योगा वर्ग योग शिक्षक ज्ञानेश्वर गिरमे,रेखा गीरमे,माधव बऱ्हाटे या योग शिक्षकांच्या विना मोबदला मार्गदर्शना खाली १ फेब्रुवारी २४पासून सुरू केला आहे.त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून नुकताच त्याचा वर्धापन दिन श्रीरंग वडा पाव आणि मिसळ हाऊस येथे केक कापून उत्साहात साजरा केला.या प्रसंगी आनंद जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष भागवत कोल्हे, उपाध्यक्ष मुरलीधर लहाने, सचिव सुरेश बोरकर यांच्या उपस्थितीत पार पडला.त्यासाठी श्रीकांत रेवणकर,रामाभाऊ कळमकर अशोक बोन्डे,चित्रा बऱ्हाटे,अलका कळमकर,सुनीता सफई यांनी विशेष परिश्रम घेतले.असे प्रसिद्धी प्रमुख अशोक बोन्डे आणि हेमांगी बोंडे यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page