एकविरा देवस्थान उपाध्यक्ष मारोती देशमुख यांची जन्मदात्या आईला मारहाण;लोणावळ्यात गुन्हा दाखल



मावळ मराठा न्युज नेटवर्क- लोणावळा,महाराष्ट्राची कुलदैवत असलेल्या कार्ला येथील आई श्री एकविरा देवस्थानाचे उपाध्यक्ष असलेल्या मारुती देशमुख आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने स्वतःच्या आईला बेदम मारहाण केलीये. आईच्या पाठीवर, हातावर, मानेवर व्रण ही उमटले आहेत.त्यामुळे मावळ परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी राहत्या घरातच आईला मारहाण केली. आई सावित्रीबाई या सात-आठ महिन्यांपूर्वी मारुती आणि दुसरा मुलगा विलास देशमुखांकडे राहायला आल्या, त्याआधी त्या पुण्यात राहणारा लहान मुलगा राजेंद्र देशमुख यांच्याकडे राहत होत्या. मात्र, आता मूळगावी देवघर या ठिकाणी जायचा हट्ट धरला आणि त्या तिथं राहायला आल्या. मात्र, स्वतःची आई आपल्याकडे राहायला आली हे मारुती देशमुख आणि कुटुंबियांना काय पचनी पडलं नाही. मग त्या इथून परत पुण्यात लहान भावाकडे जावी, म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप लहान मुलगा राजेंद्र यांनी केला आहे. जन्मदात्या आईचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची घटना देवघर येथे घडली आहे. त्यांची नुकतीच मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्ला येथील आई एकविरा देवी ट्रस्टचं विश्वस्त पद ही त्यांच्याकडे आहे. दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी राहत्या घरातच आईला मारहाण केली. आई सावित्रीबाई या सात-आठ महिन्यांपूर्वी मारुती आणि दुसरा मुलगा विलास देशमुखांकडे राहायला आल्या, त्याआधी त्या पुण्यात राहणारा लहान मुलगा राजेंद्र देशमुख यांच्याकडे राहत होत्या. मात्र, आता मूळगावी देवघर या ठिकाणी जायचा हट्ट धरला आणि त्या तिथं राहायला आल्या. मात्र, स्वतःची आई आपल्याकडे राहायला आली हे मारुती देशमुख आणि कुटुंबियांना आवडलं नाही. तिला परत पुण्यात लहान भावाकडे पाठवण्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप लहान मुलगा राजेंद्र यांनी केला आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी आईला बेदम मारहाण केली आहे.याप्रकरणी आईने लोणावळा ग्रामीण पोलिसांत मुलगा मारुती, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. आईचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या मारुती देशमुखांना बेड्या ठोकण्याची मागणी सर्व सामान्य नागरिकांची आहे.




