टाकवे नगरीत हिंदू धर्मीयांचे श्रद्धा स्थान आणि मोठा उत्सव असणारा कुंभ कलश पूजन सोहळा संपन्न

मावळ मराठा न्युज -टाकवे,अनुगामी लोकराज्य महाभियान संस्था व विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या वतीने टाकवे येथे प्रयागराज वरून आलेल्या तीर्थ कुंभ कलश पूजन सोहळा संपन्न झाला.जगभरामध्ये महा कुंभ आयोजनाची जोरदार चर्चा सुरू आहे. हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून जगभरात महाकुंभकडं पाहिलं जातं. यावर्षीचा महा कुंभ १४४ वर्षांनी आला आणि जगभरातून या महा कुंभ प्रयाग ठिकाणी ६० कोटीहून अधिक लोक या महा कुंभा मध्ये सहभागी झाली. जगभरात समरसतेच सगळ्यात मोठा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाकुंभ मेळावा. देशभरातून नवे नवे तर जगभरातून असंख्य लोक या महाकुंभामध्ये सहभागी झाली. परंतु काही मंडळींना या महा कुंभामध्ये सहभागी होता आलं नाही. त्यासाठी त्या महा कुंभामध्ये तेरा आकड्याच्या महंतांनी सिद्ध केलेले तीर्थ कलश सिद्ध करून देशभरातल्या गावोगावी तिथल्या भाविकांना ते पूजन करता यावं यासाठी अनुलोम या संस्थेच्या वतीने अनोखा उपक्रम देशभरामध्ये राबविण्यात येत आहे त्याच माध्यमातून टाकवे नगरीमध्ये हा उत्सव घेण्यात आला. या उत्सवाला अनेक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. कुंभकलशाची ग्राम प्रदक्षिणा करून कुंभकलशाच पूजन गावातील माता-भगिनींच्या बंधूंच्या हस्ते, वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं. विधिवत तीर्थ कलशाच पूजन करण्यात आलं. त्या कुंभ संदर्भात व्यवस्थित माहिती देण्यात आली त्याचं महत्त्व सांगण्यात आलं. यावेळी बोलत असताना महाकुंभ हे जगातील हिंदू धर्मियांचा आस्थेचं महत्त्वाचे ठिकाण असून समरसतेच जगातील एकमेव उदाहरण आहे असं विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री महेंद्र असवले यांनी सांगितलं.तसेच या कुंभामध्ये स्वतः प्रयागराज ला जाऊन आलेले कोंडीबा महाराज जांभुळकर यांनी त्या महा कुंभ मेळाव्यात आलेली अनुभूती विशद करून त्या भव्य दिव्य कुंभ मेळाव्याच्या व्यवस्थेचं कौतुक केलं..यावेळी अनुलोमचे भाग जनसेवक बाळासाहेब खांडभोर, तानाजी टेमगिरे, योगेश गुणाट , निखिल भांगरे , ऋषिकेश पुराणे, गौरव वाघमारे, रवी असवले, मंगल टेमगिरे, अर्चना असवले, सीमा असवले, वैदेही असवले, बबन कोंडे, महादू कुटे, भरत कुटे, महादू शिरसागर, सुभाष असवले, बंडोबा असवले, खंडू शिंदे, निवृत्ती गायकवाड आदी असंख्य माता भगिनी व भाविक उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page