‘जागतिक महिला दिन’लोणावळा महाविद्यालयात विशेष आणि विविध उपक्रमाने साजरा

मावळ मराठा न्युज नेटवर्क -लोणावळा,जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लोणावळा येथील डॉ. बी एन पुरंदरे कला, श्रीमती एस जी गुप्ता वाणिज्य, व श्रीमती एस ए मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्य संस्कृतीचे प्रदर्शन आयोजित करून महिला भगिनी वर्गासाठी विविध पदार्थांचे ‘फुड स्टॉल्स’ उभारले. यावेळी विद्यार्थी वर्गाने इडली, पाणीपुरी, मोदक, सॅंडविच, चायनीज भेळ, चायनीज मंचुरियन, गुलाबजाम, विविध प्रकारचे शीतपेय, त्याचबरोबर विविध प्रकारच्या गेम्सचे स्टॉल्स लावले होते. विद्यार्थीनी मंच च्या अध्यक्ष डॉ. रंजू बाला, प्रा. अऍनी वर्गीस, डॉ. सुपर्णा मित्रा, डॉ. धनश्री पाध्ये, प्रा. सोनम यादव, प्रा. भक्ती अहिर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विविध खेळांचे आयोजन करून महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व विद्यार्थिनी वर्गाने महिला दिन साजरा केला. लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट च्या पदाधिकार्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page