कविता कोल्हे यांना आंतरराष्ट्रीय महिला उत्कृष्टता पुरस्कार जाहीर

मावळ मराठा न्युज नेटवर्क- नुकतेच इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स फेडरेशन आणि इंटरनॅशनल ईव्ही अँड ए आय चेंबर ऑफ कॉमर्स कडून आंतरराष्ट्रीय महिला उत्कृष्टता पुरस्कार२०२५(International woman Excellence Award 2025) जाहीर झाला आहे.विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानार्थ हे पुरस्कार दिले जातात.यामध्ये मूळच्या चिनावल जि.जळगाव येथील परंतु सध्या वाकड,पिंपरी येथील रहिवासी श्री भागवत कोल्हे,अध्यक्ष आनंद जेष्ठ नागरिक संघ यांच्या स्नुषा,सौ कविता कोल्हे:डायरेक्टर कोल कॉस्मेटिक प्रा.लि यांना त्यांच्या”सौंदर्य शिक्षण आणि उद्योग नवकल्पना” या कार्यातील भरीव कामगिरीसाठी नुकताच महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कार जाहीर झाला.२२ मार्च २०२५ रोजी अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येरवडा पुणे येथील सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सौ कविता कोल्हे यांना गौरवण्यात आले.त्या प्रसंगी आय ई एफ चे अध्यक्ष डॉ अविनाश संकुडे,जनरल सेक्रेटरी डॉ आदित्य पाटकराव,आंतरराष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष डॉ निनाद वेकोले,एमआयटी कॉलेज संचालक श्री महेश थोरवे यांनी त्यांचे कौतुक केले.अतिशय अभिमानास्पद असा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page