लायन्स क्लब ऑफ लोणावळाच्या अध्यक्षपदी साधना टाटिया,शपथविधी थाटात संपन्न, कैवल्यधाम संस्थेचा गौरव





मावळ मराठा न्युज- लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळ्याचा ४८ वा शपथविधी कार्यक्रम शुक्रवार,दिनांक १३ जुन २०२५ रोजी हॉटेल चंद्रलोक येथे पार पडला. २०२५ -२६ या वर्षासाठी नूतन अध्यक्ष व संचालक मंडळ यांना शपथ देण्यात आली.अध्यक्ष : ला. साधना टाटिया, सेक्रेटरी : लायन सारिका अगरवाल, खजिनदार : लायन सुमित भडेशिया,प्रथम उपाध्यक्ष : लायन यश सोनवणे द्वितीय उपाध्यक्ष : लायन आनंद अगरवाल , तृतीय उपाध्यक्ष : लायन जितेंद्र सुराणा , संचालक सर्वश्री १)लायन नलिनी पवार, लायन कविता नय्यर, लायन विजया खंडेलवाल , लायन संतोष अगरवाल,लायन सचिन पारख, लायन अतुल मेहता, लायन किशोर पवार, लायन रवि वर्मा, जी.एल.टी कमिटी चेअरमन लायन डॉ.सिमा शिंदे, जी.एम.टी चेअरमन लायन आनंद खंडेलवाल, जी.एस.टी कमिटी चेअरमन लायन डॉ.विकास नय्यर, एल.आय एफ कमिटी चेअरमन लायन डॉ.अमोल रानडे, मार्केटींग कमिटी चेअरमन लायन जेबी.सिंग बक्षी टेल ट्विस्टर लायन राजेश देसाई, टेल टेमर लायन अविनाश बुटाला, लायन्स हार्ट फाऊंडेशन चेअरमन लायन डॉ.एच.जे. खंडेलवाल, लायन्स एज्युकेशन ट्रस्ट चेअरमन लायन नवीन भुरट यांचा शपथविधी करण्यात आला .लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन लायन संदीप शहा आहेत. त्याचबरोबर लायन्स यांची युवकांसाठी संस्था असलेल्या लिओ क्लब ऑफ लोणावळ्याच्या अध्यक्षपदी कुमारी लिओ सर्वज्ञी हुले हीचा शपथविधी करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी इंटरनॅशनल डायरेक्टर लायन नरेंद्रजी भंडारी यांच्या हस्ते शपथविधी पार पडला. लायन नरेंद्रजी भंडारी यांनी गतवर्षीच्या अध्यक्षा लायन पद्मा गुप्ता व त्यांच्या टीमने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संपुर्ण टीमचे अभिनंदन केले व नूतन अध्यक्ष लायन साधना टाटिया व त्यांच्या नूतन टीमला शुभेच्छा दिल्या.यंदाचा मानाचा “लोणावळा लायन्स एक्सलन्स अवॉर्ड २०२५ -२६ ” साठी जगविख्यात, योगा व आरोग्य यांची सांगड घालून रिसर्च करणारे स्वर्गीय स्वामी कुवल्यानंद यांनी लोणावळा येथे स्थापन केलेल्या व शंभर वर्ष पूर्ण केलेल्या “कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूट” या संस्थेची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन नरेंद्रजी भंडारी यांच्या हस्ते कैवल्य योगा इन्स्टिट्यूटच्या वतीने उपस्थित असलेले कैवल्य विद्यानिकेतन चे डायरेक्टर श्री एन डी जोशी यांना लोणावळा लायन्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.कैवल्य विद्यानिकेतनच्या प्रिन्सिपल सौ भारती कवाडे व सीनियर एक्झिक्युटिव्ह श्री बंडू कुटे हे देखील हजर होते.अध्यक्षीय भाषणामध्ये लायन नरेंद्रजी भंडारी यांनी कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूटच्या कार्याची स्तुती केली व भविष्यामध्ये लायन्स इंटरनॅशनल, लायन्स क्लब ऑफ लोणावळा व कैवल्य योगा इन्स्टिट्यूट यांनी एकत्रित चांगले सामाजिक, लोकोपयोगी,भरीव कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.कैवल्य योगा इन्स्टिट्यूट च्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कैवल्य विद्यानिकेतन चे डायरेक्टर श्री एन.डी. जोशी सर यांनी लोणावळा एक्सेलंस अवॉर्ड दिल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ लोणावळा चे आभार व्यक्त केले व कैवल्य योगा इन्स्टिट्यूट च्या कार्याच्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती दिली.व भविष्यात लायन्स क्लब ऑफ लोणावळा बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली.गतवर्षीच्या लायन्स क्लबच्या अध्यक्षा लायन पद्मा गुप्ता, सेक्रेटरी लायन नलिनी पवार, खजिनदार लायन डॉ.कविता नय्यर यांनी वर्षभर केलेल्या कार्याबद्दल सर्व मान्यवरांनी स्तुती केली. लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री अनिल गायकवाड,मारवाडी महिला संमेलन लोणावळाच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका सौ. संगीता भुरट, लायन्स क्लब लोणावळाचे फाऊंडर मेंबर लायन मुबशिर कॉन्ट्रॅक्टर, लायन संजय गोळपकर, लायन युवराज शेट्टी, माजी उपनगराध्यक्षा लायन शशीभाभी अगरवाल, प्रसिद्ध उद्योजक श्री राजेंद्र टाटिया, आर्किटेक्ट श्री. पंकज टाटीया, लायन्स क्लब चे ज्येष्ठ सदस्य राजेश मेहता, लायन विरल गाला, लायन कांता ओसवाल , लायन निराली नालेकर, विविध लायन्स क्लबचे पदाधिकारी व अनेक मान्यवर या कार्यक्रमास हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन डॉ. ममता काळे लायन डॉ. विकास नय्यर, लायन आनंद अगरवाल यांनी केले.शपथविधी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चेअरमन लायन जेबी सिंग बक्षी , लोणावळा लायन्स एक्सलन्स अवॉर्ड कमिटी चे चेअरमन लायन नवीन भुरट यांनी विशेष परिश्रम घेतले.




