श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा लोणावळ्यात उत्साहात साजरा

मावळ मराठा न्युज :-लोणावळा, शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट २०२४ रोजी लोणावळ्यात समस्त शिंपी समाज ट्रस्ट यांच्या वतीने भागवत धर्माचे आद्य संत, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा सालाबाद प्रमाणे अत्यंत उत्साह व भक्ती पूर्ण वातावरणामध्ये पार पाडला. या सोहळ्याच्या सुरुवात सकाळी भंगारवाडी येथील श्री गणेश लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये सत्यनारायणाची महापूजा ने झाली. यापुजेसाठी या पूजेसाठी सौ .शुभांगी व श्री सुधाकर हेंद्रे यांना मान देण्यात आला होता.सकाळी आकरा वाजता लोणावळा रेल्वे परिसरामध्ये असणाऱ्या संत नामदेव महाराज उद्यानाच्या फलकाचे सुशोभीकरण व त्यास ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हार अर्पण करण्यात आला.तदनंतर सायंकाळी साडे सात ते साडे आठ पर्यंत ताजे येथील प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प.दत्ता महाराज केदारी (ताजे) यांचे संत नामदेव महाराज यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या अभंगावर सुश्राव्य असे प्रवचन पार पडले. यासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा रामरक्षा स्तोत्र, मनाचे श्लोक व भीमरूपी मारुती यासारखे स्रोत्र पठणाची स्पर्धा घेण्यात आली व विजेत्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर महिला भगिनींसाठी संगीत खुर्चीचा खेळ आयोजित करण्यात आला होता यात विजेत्या महिलांना देखील आकर्षक बक्षिसे देण्यात आले.यानंतर सर्व समाज बांधवांसाठी महाभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या समारंभाच्या यशस्वीतेसाठी समस्त शिंपी समाज ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी, महिला भगिनींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला होता. या संजीवन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने जितेंद्र धीरूभाई कल्याणजी, मिलिंद चिंबळकर, सुधाकर हेंद्रे, रमेश पिसे,अमोल धोंगडे, आदी पदाधिकाऱ्यांनी गेले एक महिना मेहनत घेतली होती.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page