लोणावळ्यात मनसे मराठी पाट्या मुद्द्यावरून आक्रमक



मावळ मराठा न्यूज़ :- लोणावला,मराठी पाट्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर आक्रमक झाली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली तरी लोणावळा शहराच्या सुस्त नगरपरिषद प्रशासनाने आज पर्यंत कारवाई केलेली नाही. ह्या वर आक्रमक होत मनसेने शहरात इतर भाषिक बोर्ड फोडायला सुरुवात केली असता नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि नोटीस घेऊन त्वरित नोटिसा वाटप करण्यात आल्या. नगरपरिषद प्रशासनाच्या मध्यस्थी नंतर मनसेचे शहर अध्यक्ष श्री.भारत रमेश चिकणे ह्यानी आठ दिवसांची मुदत देत आंदोलन स्थगित केले. या प्रसंगी मनसे मा.प्रवक्ते अमित भोसले,निखिल भोसले,उपाध्यक्ष दिनेश कालेकर,सुनिल भोंडवे,चिटणीस निखिल सोमण, प्रसिध्दी प्रमुख उमेश बोडके,संघटक अभिजित फाजगे,निलेश लांडगे, संदीप बोभाटे,सौ.दीपमाला ताई बोभाटे,विश्रांत साठे,कैवल्य जोशी,विशाल सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…




