लोणावळा नगरपरिषदे तर्फे रु.७१ लाख,४० हजार दिव्‍यांग निधी वाटप

मावळ मराठा न्युज-लोणावळा,महाराष्‍ट्र शासनाने सूचीत केलेल्‍या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमातंर्गत आज दिनांक २८/३/२०२५ रोजी लोणावळा नगरपरिषद कार्यालयात दिव्‍यांग निधी वाटप कार्यक्रम आयोजीत केलेला आहे. लोणावळा नगरपरिषद हद्दीतील एकूण 238 दिव्‍यांग नगरपरिषद नोंदणीकृत करण्‍यात आलेले आहे. त्‍या सर्व दिव्‍यांगाना एकूण ७१ ,४० ,००० /- इतक्‍या रक्‍कमेचे वाटप करण्‍यात येणार आहे. प्रत्‍येक दिव्‍यांगास रुपये ३० हजार प्रत्‍येकी त्‍यांचे खात्‍यात जमा करण्‍यात येत आहे. या कार्यक्रमप्रसंगी मोठया प्रमाणात दिव्‍यांग बांधव कार्यक्रमास उपस्थित होते. लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्‍याधिकारी श्री.शरद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी संतोष खाडे, पत्रकार श्री.विशाल पाडाळे, श्री.विशाल विकारी, श्री.संजय पाटील, श्री.सुनिल म्‍हस्‍के, श्री.सागर शिंदे तसेच लेखा विभागाचे लेखापाल निलेश काळे, सतिश गावडे, दिव्‍यांग निधी विभागाच्‍या सुनिता जाधव, सहा.ग्रंथपाल विजय लोणकर, कर्मचारी बबन कांबळे, अनंता टेमघरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र राऊत यांनी केले. कार्यक्रमानंतर दिव्‍यांग बांधवाचे खात्‍यात एकरकमी रु.३०००० /- जमा झाल्‍याने सर्वानी नगरपरिषदेचे आभार मानले.तसेच एकाच वेळी ३० हजार जमा झाल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page