लायन्स क्लब ऑफ लोणावळा,खंडाळाच्या अध्यक्षपदी ला. विरल गाला,सत्यसाई कार्तिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

मावळ मराठा न्युज :-लोणावळा, लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात हॉटेल चंद्रलोक येथे पार पडला या वेळी कार्यक्रमाची सुरवात प्रमुख अतिथी माजी प्रांतपाल ला. डॉ दीपकभाई शाह,प्रमुख वक्ते गिरीशभाई शाह,समस्त महाजन परिवार,आय पी एस अधिकारी श्री सत्यसाई कार्तिक, आरसी.सुधीर कदम,झेडसी शिव अगरवाल यांची व इतर मान्यवरांची स्वागताने व दीप्रज्वलन व ला. दीपाली गाला हिने ध्वज वंदनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. मा. अध्यक्ष ला. अँड प्रफ्फुल बी लुंकड यांनी त्याचे भाषणात संक्षिप्त आढावा घेतला. त्यात एकूण ६५ ऍक्टिव्हिटी सुमारे ३५ लाखा पर्यंतचा ऍक्टिव्हिटी केल्यात. क्लब मार्फत अनेक रक्तदान शिबिरे, काऊ ऍम्ब्युलन्स, आपका दान किसीका वरदान असे महत्व पूर्ण कामे झाली व डिस्ट्रिक्ट मार्फत सुमारे १० पुरस्काराने गौरविण्यात आले व नवनिर्वाचित अध्यक्ष लायन विरल गाला, सचिव ला. मंगेश कदम, खजिनदार ला.देवल पारख तसेच इतर नवनिर्वाचित सदस्त्यांचा पदग्रहण समारंभ झाला ला. डॉ संगीता लुंकड यांनी प्रमुख अतिथी पी.डी.जी. डॉ. दिपकभाई शाह यांचा परिचय सभेला करून दिला. त्यात दानशूर, विद्या प्रेमी व सेवा कार्यात स्वतःला झोकून दिल्याचे सांगितले या प्रसंगी आय पी एस अधिकारी श्री सत्यसाई कार्तिक यांनी सभेला मार्गदर्शन केले व त्याना सेवा गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच गिरीश भाई शाह हे भारतीय जीव जंतू कल्याण बोर्ड यांचे सदस्य असून जल, जंगल, जमीन, जनावर चे उद्देश लक्षात ठेऊन भारतातील प्रत्येक गाव आदर्श गाव बनवा तसेच त्यांनी स्वतः अनेक ऍनिमल ऍम्ब्युलन्स सुरु केल्या आहेत व नदी, तलाव यांचा विकास हे सर्व कार्य टीम वर्क मधून होते असे सांगितले या वेळी सेवा सदभावना पुरस्कार देऊन मानसिक संतुलन हरवून बसलेल्यांचा सांभाळ करणाऱ्या अशा ध्येयवेड्या व्यक्तीमत्व श्री. अक्षय बोराडे याना सन्मानचिन्ह दिले त्याच्या कार्याला मदत म्हणून गिरीशभाई शाह यांनी त्याचे संस्थेस भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले व ला. प्रकाश जैन व ला. देवल पारख यांनी रोख मदत जाहीर केली तसेच चारूल योगेश शाह व विपुल माने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास उषा पंड्या डॉ . ला.दिलीप सुराणा, डॉ.ला.पोपट ओसवाल,ला. देवेंद्र नालेकर, ला. वीरेंद्र पारख, ला. मनोज लुंकड , ला. जिगर पटवा, ला. अश्विनी कदम, ला. झुबेर शमशी, ला. डॉ. रितेश खंडेलवाल, ला.निमेश पारेख डॉ. ला. नितीन पारख आदी उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. निराली नालेकर अमित लुनावत , प्रकाश जैन,आशिष पाऊन व शाझिया शमशी इतर मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page