ब्राह्मण महासभा प्रदेशाध्यक्ष पदी अभिजीत आपटे यांची नियुक्ती – चंद्रमौली शर्मा



मावळ मराठा न्यूज नेटवर्क -नवी दिल्ली अखिल भारतीय ब्राह्मण महासभा राष्ट्रीय अध्यक्ष पंडित श्री भगवान पराशर यांनी अभिजीत आपटे यांची ब्राह्मण महासभेवर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी अभिजीत आपटे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघामध्ये प्रदेश प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहिले असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ब्राह्मण समाज जोडला जावा यासाठी आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत ब्राह्मण समाजाचे नेतृत्व केले होते.तसेच परशुराम आर्थिक विकास महामंडळाला संधीसाधूंपासुन दुर ठेवण्यात आपटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.नव्याने स्थापन झालेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळावर कॅप्टन आशिष दामले यांच्या नियुक्तीने अभिजीत आपटे समाधानी असुन ब्राह्मण महामंडळ सुरक्षित हातात आहे यासाठी श्री आशिष दामले यांचे आभार मानले आहेत.आगामी काळात ब्राह्मण समाजातील तरुणांना रोजगार, उद्योगांना संधी आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी अभिजीत आपटे कौशिक हे सेवा सुधार सद्भाव संगठन या चतुसुत्रीवर काम करून ब्राह्मण महासभा राज्यभर पसरवतील असा विश्वास चंद्रमौली शर्मा यांनी व्यक्त केला आहे.




