धानोरी येथील परांडेनगर येथे घरगुती गौरी सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ थाटात संपन्न






मावळ मराठा न्युज-आज दि.०९.०९.२८२५ रोजी धानोरी येथील परांडेनगर येथे घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ वडगांवशेरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा.बाप्पुसाहेब पठारे,यांच्या शुभहस्ते संपन्न महागणेशत्सव व समाजसेविका सौ.मोनिकाताई विनोद परांडे यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधुन गणेशत्सवामध्ये भव्य लोहगांव,धानोरी,विश्रांतवाडी व कळस असे प्रभाग क्रमांक १ यानुसार घरगुती गौरी गणपती सजावटीचे आयोजन करण्यात आले यामध्ये ५०० हुन अधिक अर्ज घेण्यात आले प्रत्येकाच्या घरी जाण्यासाठी सात महिलांची टीम परिक्षक म्हणुन तयार करण्यात आली होती त्यानुसार सात महत्वाची बक्षीसे व प्रत्येकानी भाग घेतल्या बद्दल त्यांना आकर्षक असे बक्षीस स्वरूपात गिफ्ट देण्यात आले.
बक्षीस समारंभ वडगांवशेरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. बाप्पुसाहेब पठारे ,व वडगांवशेरी विधानसभेचे माननिय अजितदादा पवार गटाचे माजी आमदार सुनिलआण्णा टिंगरे यांची भावजय ( वहिणी ) सौ. शितलताई टिंगरे ,यांच्या शुभहस्ते बक्षीसे देण्यात आली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष श्री.तुषार कामठे , गोडुंबरे गांवच्या सरपंच सौ.निशाताई सावंत ,स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस श्री.धनंजय जाधव ,कामगारनेते श्री.हनुमंत परांडे ,यावेळी महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार पैलवान काळुराम लांडगे,श्री. दशरथ लांडगे,रुषीकेश येवले,श्री.सुरज वाघेरे , अजित परांडे ,मारुती गायकवाड , तेजस नाणेकर , युवानेते श्री.संदीप लांडगे , श्री.विकासआबा लांडगेउपस्थित होते कार्यक्रमासाठी विजेते व त्यांच्या नातेवाईकांनी व विशेषता महिलांनी भरपुर गर्दी केली होती कार्यक्रम संपुर्ण पारपाडण्यासाठी विशाल परांडे , पवन मोरे , संदेश परांडे , प्रशांत कानसकर , अजित कानसकर , संकेत चव्हाण , भुषण चौधरी , गणेश सोनवणे , दादाराव बोंबडे , समिर सय्यद , प्रविण दोडके , जावेद सय्यद , विनोद काळे , अजित परांडे , सतिश शिंदे , आकाश टक्के , रवि सरकाळे , अभि शेडगे , अविनाश बहिरट , श्रवण आरुडे व शिवराज प्रतिष्ठान , तसेच युवानेते श्री.विनोद परांडे, तुषार परांडे ,दत्तात्रय परांडे व मंडळातील सर्व कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी भरपुर प्रयत्न केले.



