*मॅक्सरूफ कंपनी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन*







मावळ मराठा न्युज – पुणे,काळेवाडी येथील मॅक्सरूफ कॉर्पोरेशन कंपनीतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात शनिवार २३ मे रोजी सकाळी ३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.एप्रिल व मे महिन्यामध्ये कडक उन्हाळा व सुट्यांमुळे रक्तदान शिबिरे कमी होत असल्याने सर्वत्र रक्ताचा तुटवडा असल्याने शिबिरे घ्यावीत असे आवाहन सर्वच रक्तपेढ्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मॅक्सरूफ कॉर्पोरेशन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री संजीव राय यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यासाठी भोसरी येथील संजीवनी रक्तपेढीचे सहकार्य लाभले. समन्वयक श्री मनेश म्हस्के यांनी विशेष लक्ष दिले.सर्व रक्तदात्यांना ब्लड बँक तर्फे सन्मानपत्र व भेटवस्तू देण्यात आली.मनेश म्हस्के – ७७०९० ०७२९२



