डोंगरगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार ,सफाई आणि स्वच्छतेसाठी निधि नसल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी केला परिसर स्वच्छ



मावळ मराठा न्यूज़ :- डोंगरगाव,देशभरात स्वछता अभियान राबवले जात असताना डोंगरगाव ग्रामपंचायतीकडे निधी मिळाला नाही म्हणून स्वछता करता आली नाही असे उत्तर ग्रामपंचायतीकडून मिळाल्याने संतप्त ग्रामस्थ वर्गणी गोळा करून साहित्य विकत घेवून शाळा व रस्त्यालगतचा परिसर स्वच्छ केला. ग्रामस्थांच्या आरोग्याची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना परिसरातील दुर्गन्धि पसरलेली ,त्यासाठी ग्रामस्थानी स्वच्छतेबद्दल पाठपुरावा करुन देखील ग्रामसेवक आणि निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नागरिकांच्या प्राथमिक समस्या देखील सोडवू शकत नसतील तर यापेक्षा लाजिरवानी गोष्ट काही नाही .देशात स्वछता अभियान राबवून स्वच्छ गांव आणि शहराना कोट्यवधींचा निधि मिळतो आहे.मात्र डोंगरगाव ग्रामपचायत म्हणजे दुर्गंधीचे साम्रज्य निर्माण करुन ग्रामस्थांच्या आरोग्यशी खेळताना दिसतेय .याबद्द्ल ग्रामस्थ मात्र पुढील आंदोलनाच्या तयारीत आहेत .




