ॲड. रंजनाताई भोसले यांची लिगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड



मावळ मराठा न्युज – वडगाव मावळ लिगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या सन २०२५-२६ साठीच्या अध्यक्षपदी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा ज्येष्ठ ॲड. रंजना भोसले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव न्यायालयातील वकील बाररूम मध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये ही निवड करण्यात आली.या बैठकीसाठी जेष्ठ विधिज्ञ ऍड. नामदेवराव दाभाडे, ऍड. अशोक ढमाले, ऍड. सिताराम बवरे, अॅड. विलास गोखले, ऍड. दिपक चौधरी, ऍड. धनंजय कोद्रे, ऍड. सोमनाथ पवळे, ऍड. दिलीप पंडीत, ऍड. अशफाक काझी, ऍड. शिवदास मोरे आदी उपस्थितीत बिनविरोध निवड करणेत आली. या वेळी मान्यवरांसह अनेक वकील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वडगाव न्यायालयातील वकीलांसाठी काम करणारी एक नामांकित संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या वडगाव मावळ लिगल प्रक्टीशनर्स असोसिएशनच्या सन २०२५-२६ साठीच्या अध्यक्षपदी एक अभ्यासू वकील व समाजकार्याची विशेष आवड असलेल्या तसेच अनुभवी व ज्येष्ठ ॲड .रंजनाताई भोसले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. असोसिएशनचे मावळते अध्यक्ष ॲड. सोमनाथ पवळे यानी अध्यक्षपदाची सुत्रे ॲड.भोसले यांचेकडे सोपवली. वडगांव न्यायालयाच्या वकील बार रूममध्ये असोसिएशनच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची निवड व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन यावेळी करण्यात आले.यावेळी असोसिएशनच्या कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य म्हणून ॲड. रंजनाताई भोसले (अध्यक्ष), ॲड. सुबोध कालेकर (उपाध्यक्षा), ॲड.मोनाली कुलकर्णी-शेलार (उपाध्यक्षा), अँड प्रणोत्ती पिंगळे (सचिव), ॲड. राम शहाणे (सचिव), ॲड. मुनाफ शेख (खजिनदार)यांची निवड करण्यात आली.तर सदस्य म्हणून ॲड. सागर भेटे,ॲड. श्रीकांत सावंत, ॲड. योगेश गायकवाड, ॲड. नऋतिक पंडीत, ॲड. रवि गायकवाड, ॲड. दिपाली आगळे, ॲड. अनिता पळनिटकर, ॲड. सुजाता घारे, ॲड. किरण बेनगुडे असोसिएशनच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व असोसिएशन करत असलेल्या सामाजिक कार्याचे सर्वांनीच कौतुक केले. सर्व मान्यवरांनी यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.




