पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सहकार्याने गर्भवती महीलांसाठी गर्भसंस्कार आरोग्य जागृती अभियान



मावळ मराठा न्यूज:-पिंपरी(प्रतिनिधी) आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मातृतेज फाउंडेशन संयुक्त विद्यमाने हा उपक्रम गर्भवती महिलांसाठी मानसिक व भावनिक आरोग्यासाठी मोफत उपक्रम राबवला जात आहे. गर्भास्थित अवस्थेमध्ये असताना स्त्रिया शारीरीक आरोग्याबद्द्ल प्रचंड जागरूक असतात त्याचबरोबर सरकार देखील गर्भवती महीलांच्या सदृढ़ आरोग्यासाठी निरनिराळ्या सोयी उपलब्ध करुन देत असत परंतु त्या स्त्रीला शारीरिक आरोग्यबरोबरच तिच्या शारीरिक सदृढतेबरोबरच त्या गर्भवती स्त्रीचं मानसिक व भावनिक दृष्टया सदृढ़ व सक्षम असनं अत्यंत गरजेच आहे आणि म्हणूनच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी डॉ विष्णू माने यांचे गर्भवती मातांना मानसिक आणि भावनिक दृष्टया सक्षम व सदृढ बनवणाऱ्या गर्भसंस्कार जागरूकता अभियान डॉ विष्णू माने यांच्या मातृतेज फाउंडेशन च्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आदेशावरुन सर्व हॉस्पिटल मध्ये राबविण्यात येत आहे.आतापर्यंत 1000 हून अधिक गर्भवती मतांनी या मोफत अभियानाचा लाभ घेतला आहे .




