वॉकिंग ट्रॅकच्या नावाखाली झाडांची होणार कत्तल, मैदान होणार लहान,कामाचा निकृष्ट दर्जा निखिल कवीश्वर यांचा पत्रकार परिषदेत आरोप



मावळ मराठा न्युज -लोणावळा,क्रीडा प्रेमीसाठी मैदानाची वाणवा असताना लोणावळ्यात रेल्वे क्रीडांगण हे असे मैदान आहें ज्यावर सचिन तेंडुलकर,विनोद कांबळी यांनी या मैदानावर सराव करून जगात आपल्या कारकिर्दीचा ठसा उमटावला आहे. आज या मैदानाची रेल्वे प्रशासनाकडून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. लोणावळा याठिकाणी रेल्वे विभागाकडून सुरू असलेल्या विकास कामाच्या नावाखाली क्रीडांगण बाधित होत असल्याच्या आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव व तरुण तडफदार खेळाडू निखिल कवीश्वर यांनी रेल्वे मैदानावर मैदानाची दुर्दशा दाखवत पत्रकार परिषद घेतली.यात गरज नसलेल्या वॉकिंग ट्रॅक च्या नावाखाली मैदान लहान करण्याचा घाट कोणाचे चोचले पुरवण्यासाठी घालत आहे? असा संतप्त सवाल कवीश्वर यांनी रेल्वे प्रशासनला केला आहें.याबाबत लोणावळ्यातील कोणी वॉकिंग ट्रॅक ची मागणी केली आहे का? याबाबत देखील कोणी माहिती द्यायला तयार नाहीं असेही कवीश्वर यांनी सांगितले. सिमेंटचाच वॉकिंग ट्रॅक करायचा होता तर आधीच मैदानाच्या बाहेर रस्ता आहेच त्या ठिकाणी रहदारी देखील एवढी नाहीं.शिवाय हा वॉकिंग ट्रॅक करत असलेल्या जागी अनेक जुनी झाडी आहेत.मग तोडून रेल्वे प्रशासन पर्यावरण चा ऱ्हास करणार का? असा सवाल कवीश्वर यांनी पत्रकार परिषदेत केला आहें.रेल्वे प्रशासनाला विकासच करायचा आहें तर मैदानाच्या संरक्षण भिंत आहें तीला दुरुस्त करा,पेवेलीयन ची दयनीय अवस्था आहें त्याला दुरुस्त करा, खेळाडूसाठी टॉयलेट बाथरूम बांधा,गरज नसलेल्या वॉकिंग ट्रॅक मुळे मैदान लहान करु नका अन्यथा क्रीडा प्रेमिकडून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा कवीश्वर यांनी पत्रकार परिषदेत केला आहें. आणि होत असलेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट प्रकारचा असल्याचा आरोप देखील कवीश्वर यांनी केला आहें.




