लोणावळ्याचे राष्ट्रपतीपदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांचा फकिरा कादंबरी देऊन सन्मान




मावळ मराठा न्युज -लोणावळा, प्रतिनिधी, शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने लोणावळा पोलिस्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले कर्तव्य दक्ष पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांचा सन्मान सा लो डॉ आण्णा भाऊ साठे लिखित फकीरा कादंबरी भेट देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे,मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




