श्रीकृष्ण पुरंदरे यांच्या अमृत महोत्सवी सत्कारासह ओंकार वर्तले लिखित ‘महाराष्ट्रातील वैभवशाली मंदिरे’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

मावळ मराठा न्युज -तळेगाव स्टेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार व ओंकार वर्तले लिखित ‘महाराष्ट्रातील वैभवशाली मंदिरे’ या चौदाव्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल ड्रीम्स लंच बॉक्स, नाना भालेराव कॉलनी येथे होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व संगीत अलंकार श्री. सुरेश साखवळकर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून कवि श्री. राजन लाखे आणि उद्योजक श्री. संग्राम जगताप उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मावळ शाखा कार्याध्यक्ष श्री. ओंकार म. वर्तले यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्रातील वैभवशाली मंदिरे’ या पुस्तकात राज्यातील प्राचीन व कलात्मक मंदिरांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व उलगडले आहे.या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सचिव श्री. योगेश घोडके आणि कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. साहित्य, इतिहास, आणि संस्कृतीशी जोडलेले नागरिक व रसिकांसाठी हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. आयोजकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page