शिवदुर्ग मित्र लोणावळा व मॅप्रो यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २५ मे वाई व लोणावळा येथे ओपन नॅशनल क्लायंबींग चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा




मावळ मराठा न्यूज- लोणावळा, ओपन नॅशनल क्लायंबींग चॅम्पियनशिप २०२५ शिवदुर्ग मित्र लोणावळा व मॅप्रो यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पोर्ट्स क्लायंबींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व स्पोर्ट्स क्लायंबींग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आपण ओपन नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. मॅप्रो हे वाई व लोणावळा या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. दिनांक २१ ,२२ ,२३ मे २०२५ यादिवशी वाई येथे मॅप्रोच्या वॉलवर हि स्पर्धा होणार आहे वाई येथे स्पीड व लिड या दोन प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. २४ व २५ मे २०२५ या दिवशी बोल्डरींग प्रकारची स्पर्धा शिवदुर्ग लोणावळाच्या वॉल वर होणार आहे. एकुण सहा मुले व सहा मुली असे एकूण १२ गटात हि स्पर्धा होईल. दिनांक २१ मे २०२५ वाईला सकाळी स्पर्धा चालू होईल परंतु उद्घाटन समारंभ सायंकाळी पाच ते सात या वेळेत होणार आहे. २३ मे २०२५ ला दुपारी वाईचा बक्षीस समारंभ करून स्पर्धक लोणावळ्यात येणार आहे. या प्रवासासाठी बसची व्यवस्था केलेली आहे. दिनांक २४ मे २०२५ रोजी लोणावळ्यात सकाळी स्पर्धा चालू होईल. सायंकाळी उद्घाटन समारंभ होईल. २५ मे २०२५ ला सायंकाळी बक्षीस समारंभ होईल. देशभरातून विविध राज्यांतील १९२ खेळाडू सहभागी होणार आहेत. रुटसेटर , बीलेअर, जजेस ,व स्वयंसेवक व स्पर्धक या सर्वांची तयारी झालेली आहे. वाई व लोणावळा या दोन्ही ठिकाणी आपण उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी. त्यामुळे खेळाडूना प्रोत्साहन व आशीर्वाद मिळेल. असेआवाहन शिवदुर्ग मित्र लोणावळा व मॅप्रो परिवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.




