निळकंठ नगर स्थित- विठ्ठल रुक्माई मंदिराचा अकरावा वर्धापन दिन थाटात संपन्न

जगात दोन प्रकारचे अंधार असतात! एक- निसर्गनिर्मित आणि दुसरा मानव निर्मित! चंद्र सूर्य तारे हे निसर्गनिर्मित अंधार दूर करण्यात यशस्वी होतात! तर- अशिक्षितेतून निर्माण झालेल्या अनिष्ट रूढी परंपरा- अज्ञान- अंधश्रद्धा या समुच्चयातून- जेव्हा समाज जीवनाचा तोल ढळतो- नीतीचा ऱ्हास होतो आणि माणसाचा पशु होतो- तेव्हा समाजाला सावरणारा एखादा महात्मा प्रगट होतो! त्याच्या पावलांनी तयार होणारी वाट लोक जीवनात नवीन पहाट घेऊन येते! असंच काहीसं घडलं ते स्थळ होतं तळेगाव स्थित निळकंठ नगर आणि त्याचा प्रारंभ झाला ती तारीख होती १४ मे २०१५ आणि त्या सावरणाऱ्या महात्म्याच्या स्वरूपात होते- माजी तहसीलदार आदरणीय रामभाऊ माने सर! नीलकंठ नगर स्थित- विठ्ठल रुक्माई मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनाच् औचित्य साधून दिनांक आठ मे ते १३ मे या सप्ताहात अत्यंत अभ्यासू- हरिभक्त परायण नितीन महाराज काकडे यांच्या मधुर वाणीतून विठ्ठल कथा- आठ मे ते १३ मे- या कालावधीत संपन्न झाली! दिनांक १४ मे च्या- रम्य संध्याकाळी मावळ तालुक्यातील २५ भजनी मंडळांनी सादर केलेल्या सुश्राव्य भजनांनी संपूर्ण निळकंठनगर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाल! आपल्या मर्यादित आर्थिक परिस्थितीत- समाज परिवर्तन आणि प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या श्री निंबाळकरांचा – ज्येष्ठ लेखक वक्ते डॉक्टर शालिग्राम भंडारीच्या शुभहस्ते- माननीय रामभाऊ मानेसर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत- शाल श्रीफळ आणि मानपत्र प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला! निळकंठ नगरातील अबाल वृद्धांच्या सक्रिय सहभागातून ही- ज्ञान सेवा आणि भक्तीची पालखी आपल्या सक्षम खांद्यावर पेलणाऱ्या मा तहसीलदार रामभाऊ माने सरांचा प्रसंगोचित सत्कार कलापिनीचे सर्वेसर्वा डॉक्टर अनंत परांजपे यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला!सत्काराला उत्तर देताना माने सर म्हणाले की- या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन मी जरी केले असले तरी हा भव्य दिव्य सोहळा सफल करण्यात मला साथ दिली ती- विठ्ठल रुक्मिणी मंदिर निळकंठ नगर सदस्य- रेणुका महिला भजनी मंडळ आणि गावकऱ्यांनी दिलेले आर्थिक योगदान! जवळजवळ ४०० भाविकांना- विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा प्रदान करून महाप्रसादाचा लाभही उपस्थितांना आम्ही देऊ शकलो हे मी नम्रपणे व्यक्त करतो! या समारंभाच विशेष वैशिष्ट्य म्हणजे २५ भजनी मंडळाच्या भक्तीरसातून सादर करणाऱ्या ४०० भक्तगणांनी त्यांचा विशेष सहभाग नोंदविला होता! सदर सोहळ्यास- डॉक्टर शालिग्राम भंडारी- डॉक्टर अनंत परांजपे- पंडित किरण परळीकर,रोटेरियन दीपक फल्ले- एडवोकेट श्रीराम कुबेर श्री विनायक अभ्यंकर- रोटेरियन किरण ओसवाल, श्रीमान अशोक बकरेसर- सरस्वती विद्या मंदिराचे श्री अशोक कुलकर्णी. इत्यादी मान्यवर उपस्थित होते ! या नावीन्यपूर्ण समारंभाची सांगता महाप्रसादाने झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page